लातूर-नांदेड महामार्गावर एसटीचा भीषण अपघात:अचानक समोर आलेल्या दुचकीला वाचवताना बस पलटली, दोघांचे हात तुटले तर 36 जखमी

लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. एका दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी महामंडळाची बस उलटल्याची घटना सोमवारी दुपारी 1.43 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात 36 प्रवासी गंभीर जखमी झाले असून 5 जण अंत्यवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. ही दुर्घटना नांदगाव पाटीजवळ घडली आहे. अपघातातील जखमींना तातडीने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एसटी बसचा हा अपघात अतिशय भीषण होता, या भीषण अपघातात बसमधील 48 प्रवाशांपैकी 36 प्रवाशांना जबर मार लागा आहे. त्यापैकी, 5 जणांची प्रकृती अंत्यवस्थ आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू असून याची माहिती नातेवाईक व कुटुंबीयांना देण्यात आली आहे. या अपघातात दोन प्रवाशांचे हात कोपऱ्यापासून तुटल्याचे देखील समोर आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस व जिल्हा प्रशासनाने अपघाताची दखल घेत मदत व बचावकार्य सुरू केले. अपघात जेव्हा झाला तेव्हा येथील स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली व जखमींना बसमधून बाहेर काढण्यास मोठी मदत केली आहे. तसेच रुग्णवाहिका व पोलिस प्रशासनाला या घटनेची माहिती देण्यासही स्थानिकांनी मदत केली. त्यामुळे तातडीने बचावकार्य सुरू होण्यास मोठी मदत झाली आहे. एक दुचाकी रस्त्याच्या बाजूने रास्ता ओलंडण्याचा प्रयत्न करत असताना मागून आलेल्या एसटी बसने या दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात ही बस रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन थेट पलटी झाली. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे.

Share

-