मनपा निवडणुकीसाठी मनसेबाबत तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येत निर्णय घेतील:एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करतील- उदय सामंत

मुंबई मनपाच्या अनुषंगाने मनसेबाबत महायुतीमधील निर्णय तिन्ही पक्ष एकत्र बसून घेतील. याबाबत शिवसेना पक्षाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे फडणवीसांशी बोलतील, आणि त्यानंतर निर्णय होईल, असे वक्तव्य शिवसेना नेते उदय सामंत यांनी केले आहे. दरम्यान गेली अनेक वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाबाबत सरकार सकारात्मक आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला बरोबर घेण्याचे संकेत दिलेत आहेत. फडणवीसांचे सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता महापालिका निवडणुका कधी होणार, याबाबत उत्सुकता आहे. या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात, यासाठी आमचा प्रयत्न असेल, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीचे संकेत दिले आहेत. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आमचे विचार जुळतात. त्यांना आमच्यासोबत ठेवण्यात आम्हाला रस आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत जिथे शक्य आहे, तेथे तेथे त्यांच्याशी युती करू. मविआत हिंदूत्वावरुन नाराजी आमदार मिलिंद नार्वेकर यांनी बाबरी मशिद विध्वंसाच्या घटनेचे समर्थन करणारी पोस्ट शेअर केली आहे. मात्र त्यांच्या या पोस्टवर काँग्रेस नेते रईस शेख यांनी आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा जवळ करत आहे. मात्र, काँग्रेसचा मात्र याला विरोध असल्याचं रईस शेख यांच्या पोस्टवरून दिसून येत आहे. भारताच्या इतिहासातील त्या काळ्या दिवसाचे अशा प्रकारे गौरवीकरण अयोग्य आणि अनावश्यक आहे. अशा प्रकारच्या गौरवीकरणाचा मी तीव्र निषेध करतो.” शेख यांच्या या ट्विटमुळे आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Share

-