महाराष्ट्रात ‘मर्कट लीला’ सुरू:दिल्लीतून भाजपचे नेते डमरू वाजवतात तर राज्यातील नेते नाचतात; संजय राऊत यांचा आरोप
महाराष्ट्रामध्ये सरकार बनवायचे असताना अनेक नेते हे दिल्लीत फिरताना दिसत आहेत. देशातील विरोधी पक्ष नेता संपवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज्यपालांनी दहा दिवसानंतर देखील सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिलेले नाही. तरी देखील आझाद मैदानावर शपथविधीची तयारी सुरू आहे. हे सर्व कोण करत आहे? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. ही सर्व दिल्लीतून सुरू असलेली ‘मर्कट लीला’ असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री या आहेत. असे असताना मुख्यमंत्री कसा नाराज किंवा गायब होऊ शकतो? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. दिल्लीमध्ये ईडी, सीबीआय अशी सर्व यंत्रणा आहे. मात्र तरी देखील हा सर्व खेळ सुरू असल्याचा आरोप राऊत यांनी केला. स्पष्ट बहुमत असताना देखील अद्याप मुख्यमंत्री पदाचे नाव, भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता घोषित करू शकले नाहीत. स्पष्ट बहुमत असतात देखील अद्याप राजभवनात जाऊन सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यात आलेला नाही. तसेच राज्यपालांकडून देखील अद्याप सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिलेले नाही. तरी देखील आझाद मैदानावर एवढा मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. हे कोणाच्या आदेशाने सुरू आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हा सर्व दिल्लीचा खेळ असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र मध्ये सध्या मर्कट लीला चालू असल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला. दिल्लीतून भाजपचे नेते डमरू वाजवत आहेत आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील नेते नाचत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. फडणवीस यांना डावलण्याचा डाव देवेंद्र फडणवीस यांना डावल्यासाठीच एखाद्या महाशक्तीचा डाव चालला आहे का? असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केला. याबाबत लवकरच सर्व स्पष्ट होईल, असे देखील राऊत यांनी म्हणाले आहे. एकनाथ शिंदे यांच्यात एवढी हिंमत नाही. दिल्लीतील नेत्यांची साथ असल्याशिवाय ते असे वागू शकत नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.