तपोवनात साधूग्रामच्या नावाखाली TDR चा खेळ:साधूग्राम अन् तपोवन हवे, पण भाजपची दादागिरी नको; आदित्य ठाकरेंचा सरकारवर घणाघात
नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीच्या सर्वांगीण तयारीला वेग आला असून, शहराचे रूपडे बदलण्याच्या अनेक योजना गतीमान करण्यात आल्या आहेत. मात्र, तपोवन परिसरात साधूग्राम उभारण्याच्या प्रस्तावामुळे मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. साधू-म...