महाविकास आघाडीचा नेता अखेर ठरला:भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस; नाराजी दूर करण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील एकाही घटक पक्षाला विधानसभेत विरोधी पक्ष नेता मिळेल, एवढे देखील सदस्य निवडून आलेले नाहीत. त्यामुळे आघाडीतील प्रमुख तीन पक्षांनी मिळून आता विरोधी पक्ष नेते पदावर दावा करण्यात आला आहे. मात्र अद्याप या पदावर कोणाची वर्णी लागेल? याचा निर्णय झालेला नव्हता. अखेर उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत भास्कर जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पदासाठी महाविकास आघाडीच्या वतीने विधानसभा अध्यक्षांकडे माझ्या नावाचे पत्र देण्यात आले असल्याचे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले. मात्र आता अधिवेशनाला कमी दिवस राहिले आहेत. त्यामुळे अधिवेशन संपेपर्यंत त्याची केवळ घोषणा केली आणि पुढील अधिवेशनात नियुक्ती केली तरीही सत्ताधारी पक्षाने लोकशाहीची भूज राखली, असे मी म्हणले, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाराजी दूर करण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पदावर कोणाची वाटणी लागते, याबाबत अनेक वर्क वितर्क लावले जात होते. उद्धव ठाकरे यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे यांचे देखील नाव चर्चेत होते. मात्र मधल्या काळात भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त करत मला क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर भास्कर जाधव हे पक्षांतर करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आपण पक्षांतर करणार नसल्याचे भास्कर जाधव यांनीच स्पष्ट केले. या सर्व पार्श्वभूमीवर आता भास्कर जाधव यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाच्या वतीने त्यांच्याकडे विरोधी पक्ष नेते पदाची महत्त्वाची जबाबदारी दिली जात असल्याची चर्चा आहे.

Share

-