महायुतीचे सरकार महिलांना सुरक्षित वातावरण देण्यात अपयशी:हे गुलाबराव पाटलांनी मान्य केले- रोहिणी खडसे, तुमचे सरकार निर्लज्ज प्रवृत्तीचे

महायुतीचे सरकार महिलांना सुरक्षित वातावरण देण्यात अपयशी ठरले आहे. जे गुलाबराव पाटलांनी मान्य केले आहे. आम्ही गुलाबराव पाटील यांच्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो. असे म्हणत शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. दरम्यान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्याचा आधार घेत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी महिलांनी स्वत:चे संरक्षण करावे असे म्हटले होते. सध्याच्या घडीला महिलांनी आत्मसंरक्षणासाठी सज्ज राहिले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले, यावरुन वाद निर्माण झाला आहे. गुलाबराव पाटलांच्या प्रवृत्तीचा निषेध
रोहिणी खडसे म्हणाल्या की, आम्ही महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे म्हणून संघर्ष करत असताना गुलाबराव पाटील आपले अंग काढून घेत आहेत. लढण्याऐवजी महिलांनो आत्मसंरक्षणासाठी सज्ज व्हा म्हणत तुमचे काय ते बघा असे वागत आहेत. यामुळे तुमच्या अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेध करत असून तुमच्या निर्लज्ज सरकारचा देखील आम्ही निषेध करतो, असे त्यांनी म्हटले आहे. हे महिला संरक्षणासाठी काही करणार नाही रोहिणी खडसे म्हणाल्या की गुलाबराव म्हणातात ते आता महिलांनी सुरक्षिततेसाठी त्यांना हवे ते त्यांनी करावे. यात सरकारची कोणतीही भूमिका नसेल. सरकार म्हणून महिलांच्या संरक्षणासाठी काहीही करणार नाही, असाच त्यांच्या सांगण्याचा अर्थ आहे. गुलाबरावांनी महिला सन्मानाबद्दल बोलू नये रोहिणी खडसे म्हणाल्या की, गुलाबराव पाटील यांनी यापूर्वी ते महिलांचा किती सन्मान करतात हे त्यांच्या वक्तव्यावरुन दाखवून दिले आहे. आपल्या मतदारसंघातील रस्त्यांची तुलना आपण मालिनी यांच्या गालांशी केली होती. यामुळे महिलांचा सन्मानाबाबत आपल्याला किती काळजी आहे ते आम्ही आधीच बघितले आहे. गुलाबराव पाटील म्हणतात पर्समध्ये मिरचीची पूड आणि चाकू ठेवा, आत्मसंरक्षणासाठी सज्ज व्हा, पण त्यांनी महिलांच्या सन्मानाबाबत आपण बोलूच नये.