आमदार मुंबईत, मंत्रिपदासाठी फिल्डिंग‎:लंघे शिंदे सेनेकडून, विखे भाजप तर आमदार जगताप दादांकडून रांगेत‎

विधानसभा निवडणुकीनंतर विजयी आमदारांनी मुंबई‎गाठली असून, नव्या कारभाऱ्यांना मंत्रिपदाचे वेध लागले‎आहेत. इच्छुकांमध्ये मोठी रस्सीखेच असल्याने,‎मंत्रीपदाची हौस पुरवताना महायुतीतील श्रेष्ठींची,‎दमछाक होणार आहे. जिल्ह्यात शिंदे सेनेसह दादांच्या‎राष्ट्रवादीकडून प्रत्येकी एक मंत्रिपदासाठी प्रयत्न होत‎असतानाच, भाजपकडूनही दोन मंत्रिपदासाठी प्रयत्न सुरू‎आहेत. तीस वर्षानंतर आ. संग्राम जगतापांच्या रूपाने नगर ‎‎शहराला मंत्रिपदाची अपेक्षा आहे. अशा स्थितीत ‎‎मंत्रिमंडळात, पहिल्या यादीत जिल्ह्यातील कोणाची वर्णी ‎‎लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.‎ विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ‎‎महायुतीचे आमदार मुंबईला गेले आहेत. सत्तास्थापनेच्या ‎‎हालचालींना वेग आला अाहे. मंगळवारी (२६ नोव्हेंबर) ‎‎नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो, असा अंदाज ‎‎आहे. तत्पूर्वी महायुतीमध्ये मंत्रिपदाच्या वाटपासाठी ‎‎फॉर्म्युल्यावर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून ‎‎देण्यात आली.पाच ते सहा आमदारांमागे एक मंत्रीपद‎असे सूत्र ठरवल्यास जिल्ह्याला दोन मंत्रीपदे मिळतील,‎पण जिल्ह्याचे राजकीय महत्व पाहता तीन मंत्रीपदे ‎‎जिल्ह्याच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. नेवासेत ‎‎ठाकरेंच्या शिवसेनेला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने धक्का ‎‎दिला. तेथे प्रभाव वाढवण्यासाठी शिंदेंकडून लंघेंना बळ‎देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. दुसरीकडे जायंट किलर‎ठरलेले अमोल खताळ हे देखील मंत्रिपदाच्या रेसमध्ये‎आहेत, पण त्यांची पहिलीच टर्म आहे. मागील तीस‎वर्षांपासून मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या‎अहिल्यानगरवासीयांना आ. संग्राम जगताप यांच्या रुपाने‎मंत्रिपद मिळून, शहर विकासाला चालना मिळेल अशी‎अपेक्षा आहे. उत्तरेतून दादांच्या राष्ट्रवादीकडून‎ पहिल्या यादीत‎ कोण घेणार शपथ‎
सरकार स्थापनेवेळी पहिल्या यादीत‎भाजपचे दहा, राष्ट्रवादी पाच,‎शिवसेनेचे पाच आमदार मंत्रिपदाची‎शपथ घेतील, अशी माहिती आहे.‎भाजपची यादी समोर आली नसली,‎तरी त्यात विखेंचा समावेश‎असल्याचे बोलले जात आहे. शिंदेंची‎शिवसेना व दादांच्या राष्ट्रवादीकडून‎कोणत्या आमदाराची वर्णी लागेल हे‎पाहणे औत्सुक्याचे आहे.‎ राजळेंच्या रूपाने महिलेला ‎संधी मिळणार का ?‎ जिल्ह्यात महायुतीला दहा जागांवर यश‎मिळाले, पक्षीय बलाबल पाहता‎भाजपकडून सलग आठव्यांदा राधाकृष्ण‎विखे, शिवाजी कर्डिले, विक्रम पाचपुते,‎मोनिका राजळे विजयी झाले. शिंदे‎सेनेकडून अमोल खताळ, विठ्ठल लंघे,‎दादांच्या राष्ट्रवादीतून आ. संग्राम‎जगताप, आशुतोष काळे, काशिनाथ‎दाते, किरण लहामटे विजयी झाले.‎त्यामुळे मंत्रिपदासाठी मोठी स्पर्धा आहे.‎ ५ वर्षांत जिल्ह्यात ५ मंत्री‎ २०१९ च्या विधानसभा‎निवडणुकीनंतर आघाडी‎सरकारच्या काळात महसूलमंत्रीपद‎बाळासाहेब थोरात, पालकमंत्रीपद‎हसन मुश्रीफांकडे होते. तर शंकर‎गडाख, प्राजक्त तनपुरे यांनाही मंत्री‎पदे होती. त्यानंतर राजकीय‎उलथापालथ होऊन, सत्तेत‎आलेल्या महायुतीच्या काळात‎एकमेव राधाकृष्ण विखे यांच्याकडे‎मंत्रिपद राहिले.‎ आशुतोष काळे दावेदार मानले जात‎असल्याने, रस्सीखेच दिसून येते.‎भाजपमध्ये विखेंच्या गळ्यात‎मंत्रिपदाची माळ पडेल, यात शंका‎नाही. पण भाजपकडून माजी मंत्री‎शिवाजी कर्डिले, पाथर्डीत हॅट्रिक‎करणाऱ्या मोनिका राजळे‎मंत्रीपदाच्या रेसमध्ये आहेत.‎कर्डिलेंच्या शुभेच्छा बॅनरवर अनेक‎ठिकाणी लाल दिव्यांची गाडी‎दाखवून मंत्रीपदावर दावा ठोकण्यात‎आला आहे. नवीन राजकीय‎समिकरणे जुळवताना, महायुती‎भक्कम करण्यासाठी नव्या दमाच्या‎आमदारांना बळ देऊ शकते,‎असाही अंदाज वर्तवला जात आहे.‎शिंदे सनेच्या सर्व आमदारांसमवेत‎कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी‎चर्चा केली आहे. त्यावेळी आ. लंघे‎यांनीही मंत्री शिंदे यांची भेट‎घेतल्याची माहिती समजली.‎

Share

-