मुडीसह परिसरात गहू काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून हार्वेस्टरला पसंती:पंजाब, हरियाणातून अमळनेर तालुक्यात हार्वेस्टर मशीन दाखल

अमळनेर तालुक्यात यंदा पावसाने चांगलीच साथ दिल्याने रब्बी हंगामाला फायदा झाला आहे.त्यात गहू पिकाचा मोठ्या प्रमाणात पेरा झाला असून यामुळे सरासरी उत्पादनात देखील वाढ होणार आहे. दरम्यान आता मुडीसह परिसरात शेतकऱ्यांची गहू काढण्याची लगबग सुरू झाली आहे. तालुक्यात पंजाब व हरियाणा भागातून हार्वेस्टर चालक आले असुन त्यांच्याकडून गहू काढण्यासाठी शेतकऱ्यांना वेटिंग करावी लागत आहे. गव्हाची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाल्याने आता गव्हाची मळणीला वेग आला असुन मुडीसह शेतकरी यासाठी हार्वेस्टर मशिनचा वापर करीत आहे. पारंपारीक पद्धतीपेक्षा या यंत्रामुळे गव्हाची मळणी अधिक जलद व सोपी होत असुन मुडीसह मांडळ, वावडे,लोण,भरवस,बोदडे , ब्राम्हणे या भागात महाराष्ट्र, हरीयाणा, पंजाब, राजस्थान या भागातून मोठ्या प्रमाणात मशिन दाखल झाले आहेत. मजूराची कमतरता व वाढती मजुरीला कंटाळून शेतकरी यांत्रिक पध्दतीने गव्हाची काढणी करीत आहेत. हार्वेस्टरने गहू काढणीला एकरी दोन हजार ते एकविशे रुपये घेत असून सध्या विविध भागातून दाखल झालेले प्रत्येक शिवारात हार्वेस्टर मशिन सूरू दिसत आहे