“मुद्रा’चे कर्ज मिळवताना दमछाक; अजूनही 50 टक्के लाभार्थी वंचित:दहा वर्षांमध्ये केवळ 12,64,974 लाभार्थींना मिळाले कर्ज

पंतप्रधान मुद्रा योजनेचा मोठा गाजावाजा सरकारकडून होत असला, तरी ही कर्ज मिळवताना लाभार्थींची दमछाक होत असून ५० टक्के लाभार्थी अजूनही विविध कारणांमुळे कर्ज मिळवण्यापासून वंचित राहिले आहेत. याबाबत जिल्ह्यातील लाभार्थींनी नाराजी व्यक्त केली आहे. योजना सुरू झाली तेव्हापासून जिल्ह्यात २४ लाख ३५ हजार ४३० लाभार्थींनी कर्ज मिळवण्यासाठी नोंदणी केली. या दहा वर्षाच्या कालावधीत १२ लाख ६४ हजार ९७४ लाभार्थींना कर्ज मिळाले. मात्र, उर्वरित ५० टक्के लाभार्थी या लाभाच्या प्रतीक्षेत आहे. तत्पूर्वी वर्षभरात तब्बल सव्वा लाखाहून अधिक लाभार्थींची आठशे कोटी रुपयांची प्रकरणे मंजूर करण्यात आल्याचे शिखर बँकेद्वारे सांगण्यात आले. आजवर मोठ्या प्रमाणात कर्ज वितरण झाल्याची आकडेवारी मांडली जात असली तरी त्यात खासगी सूक्ष्म वित्त संस्थांनी हातावर पोट भरणाऱ्यांना दिलेले लहान-सहान कर्जेही समाविष्ट केल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे खुल्या गटांसाठी तरतूद नाही, सरकारी योजनेतून {उर्वरित. पान ४ सर्व पात्र लाभार्थींना कर्ज देण्याचा बँकेचा प्रयत्न ^मुद्रा योजनेंतर्गत कर्जासाठी अर्ज करणाऱ्या सर्व पात्र लाभार्थींना कर्ज देण्याचा बँकांचा प्रयत्न आहे. ज्यांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आहेत, त्यांना त्या त्रुटी दुरुस्त करण्यास सांगितले जात आहे. सर्व कागदपत्रे व्यवस्थित असल्यावरच कर्ज मंजूर केले जाते. -श्याम शर्मा, व्यवस्थापक, शिखर बँक. मुद्रा योजनेचे कर्ज मिळण्यास कोणता घटक ठरतो पात्र? मुद्रा कर्जासाठी पात्र असलेल्यांमध्ये उद्योजक, छोटे व्यापारी, कारागीर, छोटे उत्पादक आणि सेवा पुरवठादार यांचा समावेश आहे. ही योजना विशेषत: प्रथमच व्यवसाय सुरू करणाऱ्यांसह ग्रामीण आणि कमी सुविधा असलेल्या ग्रामीण भागातील व्यक्तींसाठी फायदेशीर आहे. कारण, थेट बँक कर्ज मिळवण्यात त्यांना अडचणी येतात. त्यामुळेच हे मुद्रा कर्ज योजनेद्वारे अर्ज करत असतात. दोन वर्षांपासून डेअरीसाठी कर्ज मिळण्याच्या प्रतीक्षेत ^ग्रामीण भागात डेअरी व्यवसाय सुरू करायचा आहे. यासाठी दोन वर्षांआधी अर्ज केला होता. परंतु, विविध तांत्रिक कारणे सांगून कर्ज दिले नाही. मला ५ लाखापर्यंत कर्ज हवे आहे. संपूर्ण कागदपत्रे दिली तरी कर्ज मंजूर झाले नसल्याने या योजनेचा फायदा झाला नाही. -विकुल गोतवाल, वंचित नागरिक. मुद्रा कर्ज मिळवण्याची पद्धत मुद्रा योजनेचे कर्ज मिळवण्यासाठी लाभार्थींच्या पत्त्याचा पुरावा अत्यावश्यक आहे. त्यात बदल होणार असेल तर तसे कर्ज देणाऱ्या बँकेला आधी सांगावे लागते. नवे वीज बिल, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट फोटो इ. व्यवसाय ओळख आणि पडताळणी कागदपत्रे: प्रमाणपत्रे, परवाने, जीएसटी प्रमाणपत्रे यासह प्राप्तिकर भरल्याचा पुरावा आणि व्यवसायाचे बँक स्टेटमेंटही जोडावे लागतात.