नवा धोका:ड्रग्जनिर्मितीसाठी विद्यापीठातून केमिस्ट्री पदवीधरांची भरती करतात मेक्सिकन टोळ्या
अमेरिका, युरोपसह जगात सिंथेटिक ड्रग्ज फेंटेनाइलमुळे दरवर्षी हजारो तरुणांचा मृत्यू होत आहे. याची निर्मिती करणारे ड्रग्ज कार्टेल आता रसायनशास्त्राच्या पदवीधरांची वेगाने भरती करत आहेत. मेक्सिकोचे सिनालोआ कार्टेल कँपस भरती चालवत आहेत. कार्टेल लॅबमध्ये फेंटेनाइल निर्मितीच्या लोकांना कुक म्हटले जाते, त्यांना ॲडव्हान्स केमिस्ट्रीचे चांगले ज्ञान असते. जास्तीत जास्त लोकांना याचे व्यसन लागावे यासाठी आधीपासून अस्तित्वात असलेल्या ड्रग्जला शक्तिशाली बनवतात.ड्रग्ज कार्टलचा फक्तज एक उद्देश आहे, तो म्हणजे विद्यापीठाचे रसायनशास्त्राचे विद्यार्थी त्यांच्यासाठी रसायनास सिंथेसिस करून प्रीकर्सर तयार करतील, हे फेंटेनाइल ड्रग्ज निर्मितीसाठी आवश्यक आहे. ड्रग्ज कार्टेलच्या मुद्द्यावर ट्रम्प, मेक्सिकन सरकार समोरासमाेर
अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको सीमेपलीकडून ड्रग्जपुरवठा न थांबवल्यास मेक्सिकन वस्तूंवर शुल्क लावण्याची धमकी दिली.मात्र, मेक्सिकोच्या नवीन अध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनी सांगितले की मेक्सिकोला प्रीकर्सरची शिपमेंट थांबवणे आंतरराष्ट्रीय सहकार्याशिवाय शक्य नाही. प्रीकर्सर सिंथेसिस करणे सोपे नाही, जिवाला धोका : तज्ज्ञ
१८ वर्षे यूएस ड्रग एन्फोर्समेंट ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये फॉरेन्सिक केमिस्ट म्हणून काम करणाऱ्या जेम्स डीफ्रान्सेस्को म्हणाल्या, प्रिकर्सर संश्लेषणाची प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे. विद्यार्थ्यांनी गॅस मास्क आणि हॅझमॅट सूट घातलेले असू शकतात, परंतु खूप जोखीम आहे.त्यात प्राणघातक ड्रग्जचा संपर्क, स्फोट होतात.
लालूच : सामान्य नोकरीपेक्षा दुप्पट वेतनाची ऑफर देताहेत
रसायनशास्त्र पदवीधरांना आकर्षित करण्यासाठी कार्टेल कसर सोडत नाहीत. दुसऱ्या वर्षाच्या एका विद्यार्थ्यानुसार, कॅम्पस रिक्रूटमेंट कार्टेलमधील एक रिक्रूटर त्याला ६७ हजार रुपये प्रोत्साहन रक्कम व ६७ हजार रु. मासिक पगार देऊ करत आहे. जे मेक्सिकोतील केमिस्टच्या सरासरी पगाराच्या दुप्पट आहे. कुणाच्या नातेवाइकाने सहभागी केले तर कुणी नाइलाजाने जोडले गेले केस-1 | एक वर्षापूर्वी, एका नातेवाइकाने रसायनशास्त्राच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीशी संपर्क साधून तिला फेंटेनाइल कुक म्हणून काम करण्याची ऑफर दिली. तिची आई ५ मुलांना एकटीच वाढवत होती आणि दिवसाचे १२ तास घराची साफसफाई करत होती. कार्टेलने विद्यार्थ्याला साइनिंग बोनस म्हणून ८५,००० रुपये देऊ केले. ती कार्टेलची कुक बनली आहे. विद्यार्थिनीने सांगितले की कार्टेल प्रमुखाने तिला शक्तिशाली ड्रग्ज बनवण्याचे काम दिले होते. विद्यार्थिनीने सांगितले की, फेंटेनीलची क्षमता वाढवण्यासाठी तिने औषधांमध्ये प्राण्यांचे एनेस्थेटिक्स मिसळण्याचे प्रयोगही केले होते. केस-2 | तो दुसऱ्या वर्षात असताना त्याला कार्टेलने भरती केले. कार्टेलच्या प्रयोगशाळेत विद्यापीठाचे आणखी 3 विद्यार्थी 3 प्रीकर्सर तयार करण्यात व्यस्त आहेत. विद्यार्थ्याने सांगितले की,कार्टेलच्या बॉसने अलीकडेच त्याच्या कामाची प्रशंसा करण्यासाठी प्रयोगशाळेला भेट दिली आणि सांगितले की जर त्याने यशस्वीरित्या प्रीकर्सर तयार करण्यात मदत केली तर गट त्याला हवे ते घर किंवा कार देईल. विद्यार्थ्याने त्यांना सांगितले की त्याला त्याच्या वडिलांसाठी पैशांची सर्वात जास्त गरज आहे. त्याने आपले दिवसाचे काम वडिलांपासून गुप्त ठेवले. तो वडिलांना सांगायचा की तो एका कंपनीत काम करतो.