नीतेश राणेंच्या भूमिकेशी सरकार सहमत नाही:वातावरण वेगळीकडे नेण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासावर बोललेले कधीही चांगले- संजय शिरसाट

मंत्री नीतेश राणे यांच्या भूमिकेशी सरकार सहमत नाही, असे शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. असे प्रश्न उपस्थित करत त्यांना काय सांगायचे आहे हे मला कळालेले नाही, ते त्यांचे मत आहे. संजय शिरसाट पुढे बोलताना म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. असे प्रश्न उपस्थित करत वातावरण वेगळीकडे घेऊन जाण्यापेक्षा आपण महाराष्ट्राच्या विकासावर बोललेले कधीही चांगले आहे. जयंत पाटील लवकरच दादांसोबत संजय शिरसाट म्हणाले की, जयंत पाटील यांच्याबद्दल मी पहिलेच वक्तव्य केले आहे. ते जास्त काळ शरद पवार यांच्यासोबत राहण्याच्या माणसिकतेमध्ये नाहीत. लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप येणार आहे. जयंत पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्हाला दिसतील. ते अर्थमंत्री राहिलेले आहेत त्यांनी सुद्धा अनेक अर्थसंकल्प सादर केलेले आहेत. त्यांना परिस्थितीची जान आहे. कोणत्या वेळेला काय निर्णय घ्यायचा याची देखील त्यांना जान आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा योग्य वेळ आली की, तो निर्णय घेऊ. शेतकऱ्यांची आत्महत्या दुर्दैवी संजय शिरसाट म्हणाले की, बुलडाण्याच्या पुरस्कारप्राप्त शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते ही दुर्दैवी गोष्ट आहे. आदर्श शेतकरी म्हणून त्यांची नाव होते. या सर्व प्रश्नांची उत्तरे सरकारला द्यावी लागतात. तर लीलावतीमध्ये काही काळी जादू झाली असेल कदाचित बांद्राचे लोकं तिकडे गेले असावे म्हणून हे काळी जादू केली असावी. परंतू त्यांची कल्पना आम्हाला नाही. नेमके नीतेश राणेंचे वक्तव्य काय? नीतेश राणे म्हणाले होते की, आमच्यातील काही कारटे सांगतात की शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लीम होते, कोण मुसलमान शिवरायांच्या सैन्यात नव्हते. ही लोकं उगाच टेप रेकॉर्डर चालवतात. स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती. हिंदू-विरुद्ध मुसलमान होती.