महायुतीत पालकमंत्रिपदाबाबत कोणताही वाद नाही:कमी मंत्रीपदे मिळाल्याने खात्यांचे विभाजन- चंद्रशेखर बावनकुळे, राहुल गांधींवर हल्लाबोल

महायुतीचे सरकार आले आहेत, यात आमच्याकडे 16 खाते आले आहेत. आमच्याकडे जे खाते आहे त्यांचे आम्ही विभाजन केले आणि सर्वांना न्याय मिळावा असा प्रयत्न केला आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, एका विभागात दोन मंत्रीपदे असल्यावर तो विभाग चांगल्या प्रकारे पुढे जातो हे देखील विभाजनाचे कारण आहे. बऱ्यापैकी खाते कमी काही प्रश्न आमच्या तिन्ही पक्षांना पडले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 12 जिल्ह्यात मंत्री नाहीये शेवटी मुद्दा तोच आहे की महायुतीचे सरकारमध्ये थोडेसे होत असणार. पालकमंत्रीपदाबाबत कोणताही वाद महायुतीत दिसणार नाही. अगदी योग्य पद्धतीने आम्ही त्यांचे वाटप करणार आहोत. संविधानाच्या मुद्द्याचे काँग्रेसकडून राजकारण चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, परभणीच्या घटनेत जो आरोपी आहे त्याला अटक करण्यात आली आहे, तो मनोरुग्ण आहे. पण यांना त्याविषयाचे राजकारण करायचे आहे. संविधानाचा मुद्दा घेऊन यांनी लोकसभेतही राजकारण केले आताही करत आहे. परभणीची घटना ही दुर्दैवी आहे, पण शासनाने ज्या पद्धतीने सर्व दखल घेतली आहे. राहुल गांधी यांचा परभणी दौरा हा केवळ राजकारण करण्यासाठी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दोनदा पराभूत करण्याचे पाप केले. राजकारणात त्यांचे आयुष्य राहू नये यासाठी काँग्रेसने षडयंत्र काँग्रेसने केले. राहुल गांधींनी नौंटकी करू नये चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर सभागृहात येणार नाही यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले. संविधानाला तोडण्याचे प्रयत्नही त्यांनी केले. काँग्रेस अन् राहुल गांधींचा दौरा ही नौंटकी आहे. त्यांने असे करु नये, विधायक कामे करण्याकडे त्यांनी लक्षात द्यायला हवे. फडणवीसांनी खातं दिले चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मला महसूल खात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. संपूर्ण महसूली कायद्यांना, शेतकरी शेतमजुरांना, समाजातील शेवटच्या माणसाशी संबंध असलेल्या महसूल खात्याच्या कायद्याक सुधारणा करणं गरजेचं आहे. असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तसेच छोट्या कारणांमुळे विकास प्रकल्प थांबल्या आहेत. त्याला पुढे नेण्याचं काम करू. 86 हजार हेक्टर झुडपी जंगल नसताना त्याची नोंद करण्यात आली आहे, सध्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुरू आहे. लवकर याबाबतचा निर्णय येईल, पण मी माझं काम सुरू केलेय.

Share

-