विरोधीपक्ष नेतेपदावर आमचा हक्क:अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संजय राऊत यांचा दावा; म्हणाले – ‘नसता भ्रष्टाचारी मोकाट सुटतील’

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते पदावर आमचा हक्क असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्ष नेते पदाची मोठी परंपरा आहे. राज्यातील विरोधी पक्षाने अचूक कामगिरी पार पाडलेली आहे. तुम्ही निवडून आला आहात मात्र तुमचा विजय संशयास्पद असला तरीही विधानसभेत विरोधी पक्ष नेता असल्याशिवाय लोकशाही विधिमंडळ पक्षाला दिशा सापडणार नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. राज्याला विरोधी पक्ष नेता नसेल तर मंत्र्यांची मनमानी चालू राहील, भ्रष्टाचारी मोकाट सुटतील, त्यांना व्यसन घालण्यासाठी विरोधी पक्षाची तरतूद करण्यात आली असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. पुरेसे संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षनेते पद मिळेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. असा कोणताही नियम नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. अनेक राज्यात चार-पाच सदस्य असलेल्या पक्षांना देखील लोकशाहीची बूज राखण्याकरिता विरोधी पक्ष नेते पद मिळाले असल्याची परंपरा आहे. महाविकास आघाडीचे एकत्रित मिळून तर 50 आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेचा विरोधी पक्ष नेता होण्यास कोणतीही अडचण नसल्याचे ते म्हणाले. विरोधी पक्ष नेते नेतेपद देणे ही सरकारची जबाबदारी विधानसभेत विरोधी पक्षनेता नसेल तर भ्रष्टाचार वाढेल, असा आरोप करत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्ष नेते पदावर दावा सांगितला आहे. देशातील अनेक राज्यात पाच सदस्य असताना देखील विरोधी पक्षनेतेपद दिले गेले असल्याची परंपरा आहे. महाराष्ट्रात तर विरोधी पक्षांकडे एकत्रित 50 आमदारांचे संख्याबळ असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. मात्र विरोधी पक्ष नेत्यांचा निर्णय हा पत्रकार परिषदेत होत नसतो. त्यासाठी विधिमंडळ विरोधी पक्ष हा अधिवेशनात पोहोचले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेला एक परंपरा आहे. त्यानुसार विरोधी पक्ष नेते नेतेपद देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. कोण असेल ठाकरेंचा पक्षाचा उमेदवार? उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून विरोधी पक्ष नेते पदावरील संभाव्य उमेदवार कोण असेल? याबाबत मात्र संजय राऊत यांनी उत्तर दिले नाही. याबाबत विधिमंडळ पक्षाकडून निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्ष नेते पदा बाबतचा संभाव्य उमेदवार मला माहिती असला तरीही मी सांगणार नाही. असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून भास्कर जाधव, सुनील प्रभु आणि आदित्य ठाकरे यांच्या नावाची या पदासाठी चर्चा सुरु आहे.

Share

-