आयुध निर्माणी स्पोर्ट:मुख्य महाप्रबंधक सुनील सप्रे तसेच दोन महाप्रबंधकांची तडकाफडकी बदली; प्रशासनाच्या वतीने कारवाई सुरू

भंडारा जवळील जवाहरनगर आयुध निर्माणी येथील एलटीपीइ विभागात शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता स्फोट झाला होता. या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. विशेष म्हणजे या शक्तिशाली स्फोटात एलटीपी सेक्शनची इमारत जमीनदोस्त झाली. या प्रकरणात मुख्य महाप्रबंधक सुनील सप्रे तसेच दोन महाप्रबंधकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. देशातील आयुध निर्मानीचे संचालन करणाऱ्या म्युनिशस इंडिया लिमिटेडचे उप महाप्रबंधक मो. शाहीर फारुकी यांचे या बदल्या संदर्भातील आदेश जवाहरनगर आयुध निर्मानीत पोहोचले आहेत. या दुर्घटनेमुळे प्रशासनाने कारवाई सुरू केली असून तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये मुख्य महाप्रबंधक सुनील सप्रे, महाप्रबंधक ललित कुमार आणि महाप्रबंधक अनुज किशोर प्रसाद यांचा समावेश आहे. सुनील सप्रे यांच्या जागी दीपक उद्धवराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाप्रबंधक ललित कुमार आणि दुसरे महाप्रबंधक अनुज किशोर प्रसाद यांची बदली अन्यत्र झाली असली तरी ते भंडारा येथेच राहतील व नवे मुख्य महाप्रबंधक दीपक देशमुख यांना मदत करतील. स्फोटातील मृत व जखमींची नावे मृतांची नावे- जखमींची नावे- गतवर्षी जानेवारीत झाला होता स्फोट विशेष म्हणजे जानेवारी 2024 मध्येही जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीत (ऑर्डीनन्स फॅक्टरी) भीषण स्फोट झाला होता. त्यात 1 कर्मचारी ठार झाला होता. कंपनीतील सी एक्स विभागात हा स्फोट झाला होता. या घटनेपूर्वी भंडारा शहरालगत असलेल्या सनफ्लॅग कंपनीत स्फोट झाल्याची घटना घडली होती. त्यामध्ये 3 कर्मचारी भाजले होते. यावर्षी घडलेली ही पहिली घटना आहे.

Share

-