दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला आता कापरे भरले:बलुचिस्तानमध्ये गेल्या एका वर्षात तिप्पट हल्ले, खैबर पख्तुनख्वात टीटीपीचा धोका

इम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतर बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांत सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासाठी मोठा डोकेदुखी ठरत आहेत. या दोन प्रांतांमध्ये पाकिस्तानी सैन्यावर हल्ल्यांची संख्या वाढली आहे. आकडेवारीनुसार, 2024 हे वर्ष पाकिस्तानसाठी गेल्या दशकातील सर्वात घातक ठरले. या काळात दहशतवादी हल्ल्यांमध्ये 2526 लोकांचा मृत्यू झाला, जे 2023 च्या तुलनेत 90% अधिक आहे. यामध्ये 700 पोलिस कर्मचारी, 900 पेक्षा जास्त सामान्य नागरिक आणि 900 पर्यंत सशस्त्र जवानांचा समावेश होता. पाकिस्तान सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, बलुचिस्तानमध्ये वाढते लष्करी जवान आणि राज्यातील राजकीय परिस्थिती यासाठी जबाबदार आहेत. येथील नवाबांनी राजकीय पकड गमावली आहे. दुसरीकडे, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ला आंतरराष्ट्रीय थिंक टँकांनी सर्वात वेगाने वाढणारा दहशतवादी गट म्हणून घोषित केले आहे. बलुचिस्तान : येथे ५९० कोटी टन खनिज, चीनची येथे नजर पाकिस्तान सरकार बलुचिस्तानमधून बलुचांना हुसकावून लावण्यासाठी वारंवार सैन्य कारवाई करत आहे. या कारवाईची दोन मोठी कारणे आहेत. पहिले, बलुचिस्तानची भौगोलिक स्थिती, जी जगातील सर्वात श्रीमंत ठिकाणांत स्थान देते. हा भाग पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिमेत आहे. त्याचे क्षेत्रफळ इराण आणि अफगाणिस्तानच्या जमिनीचाही समावेश आहे. हा ३४७१९० चौ. किमीमध्ये पसरला आहे. या हिशेबाने हा पाकिस्तानातील सर्वात मोठा प्रांत आहे. देशाचा ४४% भूभाग हाच आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्रात पाकिस्तानची एकूण लोकसंख्या फक्त ३.६% म्हणजे, १.४९ कोटी लोकच राहत आहेत. दुसरे, या जमिनीखाली असलेले तांबे, सोने, कोळसा, युरेनियम आणि अन्य खनिजांचे भांडार आहे. यामुळे पाकिस्तानातील हे सर्वात श्रीमंत राज्य आहे. येथील रेको दिक खान जगातील सोने आणि तांब्याच्या खाणींपैकी एक आहे. हे चगाई जिल्ह्यांत आहे. येथे ५९० कोटी टन खनिज असल्याचा अंदाज आहे. त्याच्य प्रति टन भांडारात ०.२२ ग्रॅम सोने आणि ०.४१% तांबे आहे. या हिशेबाने या खाणीत ४० कोटी टन सोने दडले आहे. त्याची अंदाजित किंमत १७४.४२ लाख कोटी रुपयांपर्यंत असू शकते. असे असताना हा भाग पाकिस्तानच्या सर्वात मागास भागापैकी एक आहे. पाकिस्तान या अनमोल खाणी चीनला देऊन पाकिस्तान आपले नशीब पालटवू इच्छित आहे. बलुचिस्तानात २१ वर्षांत ७ हजारांहून अधिक लाेक बेपत्ता ‘व्हॉइस फॉर बलूच मिसिंग पर्सन्स’नुसार (व्हीबीएमपी) २००४ पासून आतापर्यंत बलुचिस्तानमधून ७ हजाराहून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. चौकशी आयोगाने मात्र फक्त ५४५ जण बेपत्ता असल्याच्या तक्रारी असल्याचा दावा केला आहे. बलुचिस्तानचा चगाई : १९९८ मध्ये पाकिस्तानने येथे केली होती पहिली अणुचाचणी मे १९९८ मध्ये पाकिस्तानात तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी बलुचिस्तानच्या चगाई जिल्ह्याच्या वाळवंटात पहिली अणुचाचणी केली होती. त्या चाचणीला चगाई-१ नाव दिले होते. बीएलएकडे ६ हजारांवर अधिक लढवय्यांची फौज बलुचिस्तान लिबरेशन आर्मीची स्थापना (बीएलए) प्रथम १९७० मध्ये झाली. मात्र काही काळातच त्यांनी आपल्या कारवाया बंद झाल्या.सन २००० मध्ये बलुचिस्तान आर्मी पुन्हा सक्रिय झाली. तेव्हापासून त्यांनी पाकची सरकारी संपत्ती व लष्कराला आपले लक्ष्य बनवले आहे.बीएलएकडे ६ हजारांहून अधिक लढवय्यांची फौज आहे. अमेरिका, पाक व ब्रिटनने या संघटनेला अतिरेकी म्हणते. बीएलए स्वतंत्र देशाची मागणी करत समांतर सरकार चालवत आहे. बीएलए अतिरेक्यांकडे आहेत अत्याधुनिक शस्त्रे साधारणत: पाकच्या लष्करी जवानांकडे ५.५६ एमएम, ७,६२ एमएम कॅलिबरची रायफल असते. त्याशिवाय ऑपरेशन यूनिट्स ९ एमएम एमपी ५ सबमशिन गनचाही वापर करतात. बलूच बंडखोरांकडे मात्र एम १६ ए ४ राइफल, एम २४० बी मशीन गन, आरपीजी-७ लाँचर, बल्गे रियाई ओजीआई-७ एमए प्रोजेक्टाइल व पीकेएम मशीन आहेत. अत्याधुनिक शस्त्रे असल्याने हे बंडखोर पाकिस्तानी लष्करावर सातत्याने हल्ले करतात.