पक्ष गटनेता नात्याने विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला आले:उद्धव ठाकरेंच्या भेटीवर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया, विरोधी पक्षनेता पदाबाबत केले भाष्य

उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या भेटीबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे एका पक्षाच्या गटनेता या नात्याने विधानसभा अध्यक्षांच्या भेटीसाठी आले होते, असे नार्वेकरांनी सांगितले. तसेच विधानसभा विरोधी पक्षनेता पदाबाबत माझ्याकडे कोणताही प्रस्ताव आला नसल्याचेही त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी आज नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर विरोधी पक्षनेता पदासाठी उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतल्याच्या चर्चा सुरू होत्या. उद्धव ठाकरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे विधीमंडळ गटनेता आहेत. त्याच अनुषंगाने ते विधानसभा अध्यक्षांच्या भेटीसाठी आले होते. ही सदिच्छा भेट होती. आपल्याकडे पाहुणे आल्यावर आपण त्यांचा पाहुणचार नेहमीच करतो, त्यामुळे त्यात नवल काहीच नाही, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. विरोधी पक्षनेता पदाबाबत चर्चा नाही
उद्धव ठाकरे यांच्याकडून विरोधी पक्षनेता पदासाठी काही प्रस्ताव आला का? असा प्रश्न नार्वेकर यांना विचारला असता माझ्याकडे अद्याप कुठलाही प्रस्ताव प्राप्त झाला नाही. यावेळी विरोधी पक्षनेते पदाबाबत चर्चा झाली नाही. माझ्याकडे विरोधी पक्षनेता पदाबाबतचा प्रस्ताव आला, तर त्यावर नियमानुसार, प्रथा-परंपरेनुसार निश्चित कारवाई केली जाईल, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले. बैठकांमध्ये कामकाजासंदर्भात चर्चा
अध्यक्ष दालनामध्ये मॅरेथॉन सुरू आहेत, या बैठकांमध्ये नेमक्या काय चर्चा सुरू आहे असे विचारले असता अधिविशेन सुरू असल्यामुळे सभागृहातील कामकाजासंदर्भात मंत्र्यांसोबत, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होत असते. त्याच अनुषंगाने कामकाजासंदर्भात या बैठकांमध्ये चर्चा झाल्याचे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले. धार्मिक स्थळाच्या विधेयकाबाबत शासनाकडे माहिती मागितली
सिद्धीविनायक मंदिराबाबत एक विधेयक सभागृहात चर्चेसाठी आले होते, ते पारितही झाले. ते पारित होत असताना शासनाकडे माहिती मागितली आहे. भारताचा धर्मनिरपेक्ष देश म्हणून संविधानात उल्लेख केलेला आहे. असे असताना केवळ एकाच समाजाचे किंवा धर्माचे धर्मस्थळ सरकारी नियंत्रणाखाली आणले जात आहे. त्यामुळे एकाच धर्माची धर्मस्थळ सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत. इतरही धर्मस्थळांवर सरकारचे नियंत्रण नाही, अशी माहिती शासनाकडून मागितली असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

Share

-