राम गोपाल वर्माला अटक करण्यासाठी पोलिस पोहोचले!:घरातून काढला पळ, आंध्र प्रदेशचे CM आणि DCM यांच्यावर अपमानास्पद पोस्ट
चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांच्या अडचणी काही थांबायचे नाव घेत नाहीये. त्याच्या अटकेसाठी आंध्र प्रदेश पोलिसांचे एक पथक त्याच्या हैदराबाद येथील घरी पोहोचल्याचे वृत्त आहे. वास्तविक राम गोपाल वर्मा यांनी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात सोशल मीडियावर अपमानास्पद टिप्पणी केली होती. याप्रकरणी त्याला चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर व्हायचे होते, मात्र तो आला नाही. चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा कोईम्बतूरला पळून गेला?
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश पोलिसांचे पथक राम गोपाल वर्मा यांच्या घरी पोहोचले, मात्र चित्रपट निर्माता तेथे उपस्थित नव्हता. मात्र, तो सलग दुसऱ्यांदा तपास अधिकाऱ्यांसमोर न आल्याने पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला. वृत्तानुसार, अटक टाळण्यासाठी तो कोईम्बतूरला रवाना झाला आहे. हे वृत्त अपडेट करत आहोत…