प्रकाश आंबेडकरांनी पाठवले थेट मुख्य निवडणूक आयुक्तांनाच पत्र:पत्रातून विचारले तीन प्रश्न, आयोगाच्या उत्तराकडे असणार लक्ष

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंगम यांना पत्र पाठवले आहे. महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदारांच्या मतदानातील तफावत आणि अंतिम आकडेवारीबद्दल चिंता व्यक्त करण्यासाठी आंबेडकरांनी हे पत्र लिहिले आहे. तसेच या पत्राच्या माध्यमातून आंबेडकरांनी तीन प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी तीन प्रश्न विचारले आहेत. आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळणे आणि आमच्या चिंतेचे निराकरण करणे महत्त्वाचे आहे कारण ते भारतीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक प्रक्रिया आणि आचरणावरील घसरलेल्या आणि डळमळलेल्या विश्वासाची प्रशंसा करतील, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि त्याचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला असल्याचे अनेकांचे मत आहे. यात महायुतीने प्रचंड बहुमताने सत्ता स्थापन केली आहे. महाविकास आघाडीचा तसेच इतर पक्षांचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे यात ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात आहे.

Share

-