राज्यावर 9 लाख 32 हजार कोटींचे कर्ज:गरिबांना मिळणाऱ्या योजना बंद, महायुती सरकार राज्य कसे चालवणार- संजय राऊत

राज्यावर 9 लाख 32 हजार कोटी रुपये कर्ज आहे. आता हे कर्ज काढून राज्य चालवंले आणि लुटले जात आहे. राज्यावरील कर्ज वाढत असताना लाडक्या बहिणींसारख्या योजन्या आणल्या आणि आता त्या बंद करायच्या मार्गावर आहे, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा योजनेसारख्या गरिबांना मिळणाऱ्या योजना बद करण्यात आल्या आहेत. राज्य कसे चालवणार हा आता प्रश्न आहे. कर्ज काढून दिवाळी साजरी करणे आणि निवडणुकांमध्ये मते विकत घेणे हा कर्ज बाजारी महाराष्ट्राची तिजोरी महिलांची मते विकत घेण्यासाठी वापरली. कर्जाचा डोंगर कसा कमी करणार संजय राऊत म्हणाले की, जाहीरनाम्यात महायुतीच्या ज्या दोन घोषणा आहेत, त्या बहिणींना 2100 रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी यांचे तुम्ही काय करणार आहात, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. याचे उत्तर राज्याच्या जनतेला दिले पाहिजे. राज्यावरील कर्जाचा डोंगर तुम्ही कसा कमी करणार आहात? प्रत्येक माणसांच्या डोक्यावर किती कर्ज तुम्ही केले आहे याचा हिशोब तुम्ही करायला हवा. तुमचे कर्ज ह्या राज्याची जनता फेडणार आहे. शक्तीपीठ मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध संजय राऊत म्हणाले की, शक्तीपीठ मार्गाची मागणी कुणी केली होती. ठेकेदारांकडून जे गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले गेले हे रस्ते बनवणारे ठेकेदार आहे. समृद्धी असो किंवा शक्तीपीठ बनवणाऱ्या ठेकेदारांकडून हजारो कोटो रुपये आधीच काढून घेतले आहेत. त्यांना टेंडर देत करोडो रुपये काढून घेण्यात आले, ते निवडणुकीत किंवा आमदार-खासदार फोडण्यात वापरले असतील. शक्तीपीठाच्या संदर्भात जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध असून ते रस्त्यावर उतरले आहेत. काही ठेकेदारांना मालमाल करण्यासाठी महामार्ग? संजय राऊत म्हणाले की, ज्या 100 शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांना शक्तीपीठ महामार्गाबाबत निवेदन दिले आहे, हे शेतकरी भाजपाचे एजंट असावे. त्यांच्यामार्फत जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू असावेत, असा आरोप राऊतांनी केला आहे. तर सामान्य शेतकऱ्यांना जमीन द्यायची नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. तर मुळात या महामार्गाची गरज काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हा मार्ग महत्त्वाचा का हे जनतेला तुम्ही पटवून द्या. काही ठेकेदार मालामाल व्हावे यासाठी हा महामार्ग नाही ना? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. हे कसले हिंदूत्व महायुती सरकारच्या काळात होळीला परवानगी मिळत नाही. उद्या गणेशोत्सव येणार आहे. गणपतीच्या पीओपीच्या मुर्तीवर बंदी आणली आहे. वर्षांतून एकदा येणारा सणावर तुम्ही बंधन आणत आहात. यापूर्वी असे कधीच झाले नाही. आमच्या राज्यात हिंदूचे सण खुल्या वातावरणात होतील हे तुम्ही सांगत होतात मग आता काय झाले, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. गढूळ पाण्यात लोकांना स्थान का करायला लावले? संजय राऊत म्हणाले की, गणेशोत्सवाला बंधन, दिवाळीत फटाक्यावर बंधन आहेत. ठीक आहे पर्यावरणासाठी तुम्ही बोलत असाल पण पर्यावरणाची इतकी काळजी असेल तर महाकुंभच्या वेळी गढूळ पाण्यात लोकांना स्थान का करायला लावले. तिथे सर्व जमले आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्हाला पर्यावरणाच्या गोष्टी सांगतात असे म्हणत राऊतांनी भाजप सरकारवर टीकास्त्र डागले आहे.