रंग काढण्यासाठी नदीत गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू:देशभरात होळीचा उत्साह असताना बदलापूर शहरातून अतिशय दुःखद बातमी

देशभरात होळीचा उत्साह असताना दुसरीकडे बदलापूर शहरातून अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. बदलापूर जवळील उल्हास नदीत पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून चार मुलांचा मृत्यू झाला आहे. होळी आणि धुळवडीचा रंग खेळल्यानंतर रंग काढण्यासाठी आणि आंघोळ करण्यासाठी हे मित्र नदीवर गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. बदलापूर शहरातील चामटोली जवळच्या पोद्दार गृह संकुलात ही चारही मुले राहत होती. ही मुले दहावीच्या वर्गात शिकत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. या मुलांचे दहावीचे पेपर सुरू आहेत. आता त्यांचे केवळ दोनच पेपर अद्याप बाकी आहेत. मात्र धुळवड असल्याने ही मुले रंग खेळली आणि रंग काढण्यासाठी आणि आंघोळी साठी म्हणून बदलापूर परिसरातील उल्हास नदीत गेली होती. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ही चारही मुले बुडण्याची माहिती समोर आली आहे. बदलापूर मध्ये एकीकडे होळीचा उत्साह सुरू असताना अचानक झालेल्या या घटनेमुळे या परिसरात शोककळा पसरली आहे. गेल्या वर्षी माहिम परिसरात घडली होती घटना गेल्या वर्षी देखील माहिम येथील समुद्रकिनारी फिरायला आलेली 5 मुले बुडाली होती. कॉलेजात शिकणारी ही सर्व मुले समुद्रकिनारी फिरायला गेली होती. त्यानंतर हा प्रकार घडला होता. या घटनेची माहिती मिळताच समुद्रात बुडालेल्या पाच पैकी 4 जणांना वाचवण्यात यश आले होते. त्यातील 2 जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले होते. तर दोघांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील हर्ष किंजले नावाच्या विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर होती मात्र, उपचारानंतर त्याचा मृत्यू झाला होता.

Share

-