शिंदेंच्या भेटीसाठी दीपक केसरकर दरेगावात:मुख्यमंत्र्यांनी बंगल्याच्या गेटवरूनच माघारी पाठवले, तब्येतीचे दिले कारण
महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या घडामोडी घडत असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या दरे या मूळ गावी निघून गेले. यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यातच त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते आपल्या गावी आराम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान शिवसेनेचे नेते दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी दरे गावी गेले होते. मात्र, त्यांना बंगल्याच्या गेटवरूनच माघारी फिरावे लागले. त्यानंतर ते मुंबईला रवाना झाले. एकनाथ शिंदे प्रकृती ठीक नसल्याने दीपक केसरकरांना भेटले नाहीत, असे दरे गावातील एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय संजय मोरे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे ते आरामासाठी गावी आले आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी देखील आहे. एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते आणि लोक येत आहेत. पण त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते कोणालाही भेटत नाहीत, असेसंजय मोरे म्हणाले. त्यामुळे शिंदेंनी दीपक केसरकर यांची भेट घेण्यास नकार दिल्याचेही मोरे यांनी सांगितले. शिंदे आज मुंबईला परतणार
महायुती सरकारमध्ये मंत्रिपदांच्या वाटपाबाबत अडचण आहे. शिंदे हे मुख्यमंत्रीपद सोडण्याऐवजी गृहमंत्रालयावर ठाम आहेत. 29 नोव्हेंबर रोजी ते अचानक सातारा येथील त्यांच्या वडिलोपार्जित गावी गेल्याने त्यांची नाराजी स्पष्ट दिसून आली. त्यांची प्रकृती खालावली. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. आज दुपारी ते मुंबईला परतणार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंची गृहखात्यावरून नाराजी?
शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते होते. त्यांना हे मंत्रिपद सोडायचे नाही. आम्हाला उपमुख्यमंत्रीपद मिळत असेल तर त्यांना गृहखातेही मिळायला हवे, असा शिंदे गटाचा युक्तिवाद आहे. शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीतही तोडगा निघू शकला नाही. दरम्यान, यापूर्वी गृहखाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. या वादामुळे शहा यांच्या बैठकीत मंत्रिमंडळ स्थापनेवर कोणताही तोडगा निघू शकला नसल्याचे मानले जात आहे. गृहमंत्रीपद भाजप कधीही जाऊ देणार नाही, असेही जाणकारांचे मत आहे. हे ही वाचा… एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे जनतेला वाटणे स्वाभाविक:पण त्यांनी हा विषय संपवलाय – गुलाबराव पाटील एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे जनतेला वाटणे स्वाभाविक आहे. सगळ्या घटकांची कामे केल्यामुळे सहाजिकच जनतेची भावना आहे की त्यांनी मुख्यमंत्री व्हावे, असे शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. तर पुढे बोलताना ते म्हणाले की, या विषयात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझा कुठलाही अडचणीचा विषय नाही या शब्दात हा विषय खोडून टाकला आहे. पूर्ण बातमी वाचा… महाराष्ट्रात सहा महिन्यात 42 लाख मतदार कसे वाढले:जितेंद्र आव्हाड यांचा निवडणूक आयोगाला सवाल महाराष्ट्राच्या निवडणुकीतील आकडेवारी जुळता जुळेना. महाराष्ट्रात 6 महिन्यांत 42 लाख मतदार कसे वाढले?, मते वाढवण्यासाठी ईव्हीएममध्ये छेडछाड केली का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. पूर्ण बातमी वाचा…