मंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना सर्व अधिकार:फडणवीस-शिंदे- पवार योग्य निर्णय घेतील, माध्यमांमध्ये खाते वाटपावर चर्चा करत नसतात- शंभुराज देसाई
मंत्रीपद कुणाला द्यायचे हे अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांनी अधिकार घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय आमच्या सर्व आमदारांना मान्य असेल असे वक्तव्य शिवसेना नेते शंभुराज देसाई यांनी केले आहे. शंभुराज देसाई पुढे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. आम्हाला सर्वांना पास दिलेले होते, त्या ठिकाणी काही लोकं जाऊन बसल्याने गर्दी झाली होती. पुढे-मागे बसण्यावरुन महायुतीमध्ये काही नाराजी नाट्य होणार नाही. तिन्ही नेते योग्य निर्णय घेतील शंभुराज देसाई म्हणाले की, खातेवाटपाबद्दल देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे तिघे मिळून योग्य निर्णय घेणार आहेत. कुणाला कोणते मंत्रिपद द्यायचे, किती मंत्रिपद द्यायचे याचा निर्णय महायुतीमधील प्रमुख नेते घेतील. आम्ही सत्ता स्थापनेवेळीच सांगितले होते की आम्ही कुठेही अडवणूक करणार नाही. राऊतांचे बोलणं गांभीर्याने घेत नाही शंभुराज देसाई म्हणाले की, संजय राऊत काय बोलतात यांच्यावर काही बोलणार नाही. ते रोजच काही तरी बोलत असतात, आम्ही त्यांचे बोलणं गांभीर्याने घेत नाही, असे म्हटले आहे. दोन दिवस नव्या सदस्याचा शपथविधी शंभुराज देसाई म्हणाले की, आज आणि उद्या दोन दिवस सर्व नवनिर्वाचित सदस्याचा शपथविधी नियोजित कार्यक्रम सुरू आहे. ज्येष्ठतेनुसार शपथविधी सुरू आहे, उद्यापर्यंत हे सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन विधानसभा अध्यक्ष निवडीचा प्रक्रिया सुरू होईल. सोमवारपर्यंत हे पूर्ण होईल. खाते वाटपाची चर्चा माध्यमांमध्ये बाईट देत होत नसते शंभुराज देसाई म्हणाले की, महायुतीमध्ये कोणत्या नव्या पक्षाला सोबत घ्यायचे असेल तर त्यावर देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे हे तिघे निर्णय घेतील. मंत्रिपद माध्यमांवर बाईट देऊन मागणी करु नये. पक्षांतर्गत बैठकीत वरीष्ठ नेत्यांकडून यावर चर्चा केली जाईल. या चर्चा माध्यमांमध्ये बाईट देऊन हो नसतात, हे जबाबदार पदाधिकाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे, असेही यावेळी शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे.