रशिया-युक्रेन युद्ध:ट्रम्पशी खनिज करारास तयार, आपला भाग रशियाला देणार नाही- झेलेन्स्की, अमेरिकी अध्यक्ष ट्रम्पसोबत चर्चेच्या 3 दिवसांनंतर प्रस्ताव

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादोमिर झेलेन्स्की यांनी सोमवारी लंडनमध्ये युक्रेन अमेरिकेसोबत खनिज करार करण्यास तयार असल्याचा पुनरुच्चार केला. मात्र, युक्रेनला प्रत्यक्षात सुरक्षेची हमी हवी आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत शुक्रवारी ओवल ऑफिसमधील चर्चेनंतर सांगितले की, आम्हाला शांततेची गरज आहे, अंतहीन युद्ध नाही. त्यामुळे सुरक्षेची हमी याची किल्ली आहे. यासोबत त्यांनी सांगितले की, रशियाने त्यांनी कब्जा केलेले कोणतेही युक्रेनी क्षेत्र त्यांना देणे मान्य नाही.
झेलेन्स्की व ट्रम्प यांच्यात शुक्रवारी खनिज करारावर स्वाक्षरी होणार होती, मात्र ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प, उपाध्यक्ष वेन्स आणि झेलेन्स्की यांच्या वाटाघाटी अचानक वादात रूपांतरीत झाल्या. आता झेलेन्स्की यांचे म्हणणे आहे की, ट्रम्पसोबत त्यांच्या बैठकीनंतर अमेरिकी अध्यक्षीय भवन व्हाइट हाऊससोबत त्यांचा कोणताही संवाद झाला नाही. मात्र,ते करारास तयार आहेत. आम्हाला युरोप व्हायचे नाही, पुतीनपेक्षा मोठा धाेका घुसखोरी : ट्रम्प ट्रम्प यांनी युक्रेन मुद्द्यावर रशियासोबत आपली वाढत्या जवळीकतेवरून होत असलेल्या टीकांवर प्रतिक्रिया देत सांगितले की, अमेरिकेला पुतीन यांच्याबाबत कमी चिंता केली पाहिजे. ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल प्लॅटफॉर्मवर लिहिले की, आम्हाला पुतीनबाबत चिंता करण्यात कमी वेळ घातला पाहिजे. आपल्या देशात येणारे अवैध स्थलांतरित, अत्याचारी टोळ्या, ड्रग माफिया, खुनी आणि मानसिक संस्थांतून आलेल्या लोकांबाबत जास्त चिंता केली पाहिजे. ज्यामुळे आपली स्थिती युरोपसारखी होऊ नये. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी युक्रेन युद्धाबाबत नवा प्रस्ताव ठेवला आहे. त्यात हवाई, सागरी आण्िा महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवरील हल्ले रोखण्यासाठी एका महिन्याच्या युद्धबंदीचा समावेश आहे. फ्रान्सचे विदेशमंत्री जीन-नोएल बॅरोटने सल्ला दिला की, युक्रेनमध्ये एका महिन्याची युद्धबंदी स्पष्ट करेल की, रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन सद्भावनेसोबत काम करतात की नाही. बॅरोट यांच्यानुसार, युद्धबंदी हे दर्शवेल की, पुतीन शांतता कराराबाबत गांभीर्याने चर्चा करण्यास तयार आहेत की नाहीत. अमेरिकी संरक्षणमंत्र्यांचा रशियाविरुद्ध सायबर ऑपरेशन रोखण्याचा आदेश, पुतीन नाराज होऊ नये ही शक्यता अमेरिकी संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी अमेरिकी सायबर कमांडला रशियाविरुद्ध आक्रमक सायबर ऑपरेशन रोखण्याचा आदेश दिला आहे. हा निर्णय पुतीन यांना अमेरिकेसोबत नव्या संबंधावर चर्चेसाठी आकर्षित करण्याच्या प्रयत्नांचा भाग आहे. एक विद्यमान व २ माजी पेंटागॉन अधिकाऱ्यांनुसार, संवेदनशील कूटनीतीक वाटाघाटीदरम्यान लष्कर मोहीम रोखणे सामान्य बाब आहे. मात्र, अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले की, रशियाने अमेरिकी नेटवर्कमध्ये घुसखोरीचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. युरोपात रशियन तोडफोडीचा प्रयत्न वाढला आहे. अमेरिकेने युरोपीय देशांना प्रत्युत्तराच्या कारवाईत मदत केली. विदेशमंत्री मार्को रुबियो यांनी रशियाला वाटाघाटीच्या टेबलवर आणण्याची आवश्यकता व्यक्त केली. सीनेटर चक शूमर यांनी ट्रम्प प्रशासनाने त्यास एक गंभीर रणनीतीक चूक संबोधले आहे.

Share

-