संभाजीनगरात 15 हजार कोटींचे 3 प्रकल्प:महाराष्ट्रात 5 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार, 20 कंपन्यांतून 87,230 राेजगार शक्य
स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत पहिल्याच दिवशी जगभरातील २० बड्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात सुमारे ५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. हे उद्योग प्रत्यक्षात सुरू झाल्यास या माध्यमातून तब्बल ८७ हजार २३० लोकांना रोजगार मिळू शकतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये १५ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे ३ प्रकल्प येणार असून त्यातून ५,५३५ जणांना रोजगार मिळतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हे महत्त्वपूर्ण करार करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरात हे तीन प्रकल्प येणार अवनी पॉवर बॅटरीज
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक : 10,521 कोटी
रोजगार : 5000 जेन्सोल
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक : 4000 कोटी
रोजगार : 500 एबी इनबेव
क्षेत्र : अन्न आणि पेये
गुंतवणूक : 750 कोटी
रोजगार : 35
कंपनी उत्पादन गुंतवणूक रोजगार स्थळ कंपनी उत्पादन गुंतवणूक रोजगार स्थळ जेएसडब्ल्यू समूह स्टील, सिमेंट, लिथियम बॅटरीज, 3 लाख कोटी 10,000 नागपूर सोलार, नवीनीकरणीय ऊर्जा गडचिरोली
कल्याणी समूह संरक्षण, स्टील, ईव्ही 5200 कोटी 4000 गडचिरोली
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर संरक्षण 16,500 कोटी 245 रत्नागिरी
बालासोर अलॉय लि. स्टील आणि मेटल्स 17,000 कोटी 3200
विराज प्रोफाइल्स प्रा. लि. स्टील आणि मेटल्स 12,000 कोटी 3500 पालघर
वारी एनर्जी हरित ऊर्जा, सौर उपकरणे 30,000 कोटी 7500 नागपूर
टेम्बो संरक्षण 1000 कोटी 300 रायगड
एल माँट पायाभूत सुविधा 2000 कोटी 5000 पुणे