संतोष देशमुखांना कोणत्या शस्त्रांनी मारहाण झाली?:SIT ने कोर्टात सादर केली शस्त्रांची रेखाचित्रे; एक शस्त्र खास पद्धतीने केले होते तयार

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्येचे हृदयद्रावक फोटो काही दिवसांपूर्वीच समोर आले होते. त्यानंतर आता या हत्येसाठी आरोपींनी वेगळीच हत्यारे वापरली. या हत्यारांचे रेखाचित्रे एसआयटीने अधिकाऱ्यांनी दोषारोपपत्रातून न्यायालयासमोर सादर केले आहे. संतोष देशमुख यांना मारहाण करण्यासाठी आरोपींनी ही हत्यारे बनवून घेतल्याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांना मारहाण करताना जी हत्यारे वापरली होती. ती सगळी हत्यारे सध्या तपास यंत्रणेच्या ताब्यात आहेत. काही हत्यारे सुस्थितीत आहेत, तर ज्या पाइपचा वापर करण्यात आला होता, त्या पाइपचे सोळा तुकडे झाले होते. हे तुकडे देखील तपास यंत्रणेकडे आहेत. यातील काही हत्यारांची रेखाचित्रे खालीलप्रमाणे आहेत. संतोष देशमुख यांना मारहाण करण्यासाठी आरोपींनी हे वेगळेच प्रकारचे हत्यार तयार केले होते, अशी माहिती आहे. या हत्याराच्या माध्यमातून देशमुख यांना मारहाण करण्यात आली होती. ही हत्यारे नेमकी कशा पद्धतीची होती. याचे रेखाटन सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी तयार करून न्यायालयात सादर केले आहे. संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करण्यात आली होती. त्यांच्या मृतदेहावर दीडशेहून अधिक लहान, मोठे व्रण असल्याचे समोर आले होते. या मारहाणीमुळेच त्यांचा मृत्यू झाला. क्लच वायर, गॅस पाइप, लोखंडी पाइप तसेच पीव्हीसी पाइपने देशमुख यांना मारहाण झाली होती. त्यांच्या अंगावर हे व्रण उमटल्याने संपूर्ण त्वचा काळी निळी पडली होती. आता या हत्यारांची रेखाचित्रे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर सादर केले आहे. ती रेखाचित्रे आता समोर आली आहेत. दरम्यान, संतोष देशमुख हत्याकांडात वाल्मीक कराड हाच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे सिद्ध करण्यासाठी 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब महत्त्वाचे ठरलेत. या साक्षीदारांच्या जबाबातून बीडमध्ये वाल्मीक कराड, विष्णू चाटे व सुदर्शन घुले यांच्या टोळीची असणारी प्रचंड दहशत अधोरेखित झाले आहे. विशेषतः वाल्मीक कराडची एक नव्हे तर अनेक टोळ्या असल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे. एका साक्षीदाराने वाल्मीक कराडच्या सुटकेसाठी सुदर्शन घुलेच्या टोळीतील लोकांनीच आंदोलन केल्याचा दावा केला आहे. तो म्हणाला, वाल्मीक कराडने जिल्ह्यात आपले वर्चस्व राखण्यासाठी अनेक टोळ्या तयार केल्यात. याच टोळ्यांच्या माध्यमातून तो अनेक कंपन्यांकडे खंडणी मागतो. तसेच खंडणी मिळाली नाही तर तो कंपनी बंद पाडतो. एवढेच नाही तर खंडणीत अडथळा निर्माण करणाऱ्याला हे मारहाण करण्यासही कमी करत नाहीत. याच दहशतीमुळे वाल्मीक कराडविरोधात कुणी गुन्हा दाखल करत नाही.

Share

-