शरद पवारांचा बाबा आढाव यांच्या EVM विरोधी आंदोलनाला पाठिंबा:आंदोलनस्थळी दिली भेट; सरकारला विरोधक नको असल्याचा आढाव यांचा आरोप
सरकारी तिजोरीतून लोकांना पैशांचे वाटप करण्यात आले असल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी केला आहे. बाबा आढाव यांचे तीन दिवसापासून सुरू केले आहे. त्यांच्या उपोषण स्थळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी भेट दिली. ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप देखील बाबा आढाव यांनी केला आहे. सरकारी तिजोरीची लूट सुरू असल्याचे यावेळी आढाव म्हणाले. राज्यभरातून या उपोषणाला पाठिंबा मिळत असल्याचा दावा देखील यावे उपोषणकर्त्यांच्या वतीने करण्यात आला. सरकारला विरोधक नकोच आहेत. त्यांना तुम्ही नकोच असल्याचे बाप आढाव यांनी शरद पवार यांच्याशी बोलताना सांगितले. तर शरद पवार यांनीही आमचा बाबा आढवा यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. सरकार जनतेची फसवणूक करत असल्याचे देखील बाबा आढाव यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर ईव्हीएममध्ये नागरिकांनी टाकलेलेच मतदान आहे, याचा पुरावा काय? असा प्रश्न बाबा आढाव यांनी या वेळी उपस्थित केला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू केले आहे. राज्यघटना आणि लोकशाहीची सध्या थट्टा सुरू असल्याची त्यांनी टीका केली. बाबा आढाव पुणे येथील फुले वाडा येथे आंदोलनाला बसले आहेत. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांनी वयाच्या 95 व्या वर्षी 3 दिवसांचे आत्मक्लेश उपोषण सुरू केले. ईव्हीएमवरील मतदान प्रक्रिया संशयास्पद म्हणत लोकशाहीचे वस्त्रहरण सुरू असल्याचे बाबा आढाव यांनी म्हण्टले आहे. छगन भुजबळ यांनी देखील आंदोलन स्थळी बाबा आढाव यांची भेट घेतली होती. निवडणूक आयोगाने आक्षेप न घेणे अनाकलनीय उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. अदानींच्या विरोधात लोकसभेत बोलू दिले जात नाही. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे याबाबत मी सरकारच्या विरोधात सत्याग्रह करत असल्याचे आढाव यांनी म्हटले आहे. सरकार जर चुकत असेल तर त्यांना वेळीच सांगितले पाहिजे. लोकशाहीतील एक नागरिक म्हणून माझे ते कर्तव्य आहे. निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणे म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणे आहे. त्यावर निवडणूक आयोगाने कोणताही आक्षेप घेतला नाही, हे अनाकलनीय आहे, असे बाबा आढाव म्हणाले होते.