राजकीय वर्तुळातून धक्कादायक घटना:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे पदाधिकारी अशोक धोडी सात दिवसापासून बेपत्ता

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच आता पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील राजकीय वर्तुळातून धक्कादायक घटना समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे पदाधिकारी असलेले अशोक धोडी हे मागील आठ दिवसापासून बेपत्ता आहेत. पोलिसांनी धोडी यांचा सर्वत्र शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा अद्याप कुठेही थांगपत्ता लागलेला नाही. अशोक धोडी अचानक गायब झाल्याने स्थानिकांकडून त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. तर त्यांचे अपहरण झाले असल्याचा संशय धोडी यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. अशोक धोडी हे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत देखील डहाणू विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून काम केले होते. मात्र राजकीय पक्षात असलेले धोडी हे मागील आठ दिवसापासून बेपत्ता आहेत. त्यांचे अपहरण झाले असल्याचा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. 20 जानेवारी रोजी अशोक धोडी यांनी आपल्या पत्नीला फोन करून डहाणू येथून घरी येत असल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला आणि त्यानंतर ते कोणाच्याही संपर्कात नाहीत. तेव्हापासून ते बेपत्ता झाले आहेत. राजकीय षडयंत्र आहे का? याचा तपास फोन आल्यानंतर प्रतीक्षा करून देखील धोडी हे घरी आले नाही. तसेच त्यांचा फोन बंद येत असल्याने कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. आता या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना अपहरण करून गुजरातमध्ये नेल्याचा संशय व्यक्त केला आहे. धोडी यांचे अपहरण करण्यामागचे कारण काय असू शकते? याचा तपास आता पोलिस घेत आहेत. वास्तविक अशोक धोडी हे महाराष्ट्र गुजरात सीमा प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यामुळे त्यांच्या अपहरणामागे राजकीय षडयंत्र आहे का? याचा तपास पोलिसांकडून घेतला जात आहे. कारचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर यादरम्यान धोडी यांच्या कारचे सीसीटीव्ही फुटेज देखील व्हायरल होत आहे. इतकेच नाही तर अशोक धोडी यांच्या कारचे वेवजी डोंगरी जवळ काचा देखील पोलिसांना सापडल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणी अपहरण झाल्याचा संशय आणखीनच बळावला आहे. धोडी यांच्या कारचे एक सीसीटीव्ही व्हिडिओ देखील आता समोर आले आहे. मात्र, या प्रकरणातील पोलिसांनी तपासाची चक्रे ही वेगाने फिरवावी अशी मागणी होत आहेत.

Share

-