सोनाक्षी सिन्हाने मुकेश खन्ना यांना दिली वॉर्निंग:शक्तिमानने शत्रुघ्न सिन्हांबद्दल केली होती कमेंट

सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुकेश खन्ना यांना खडेबोल सुनावले. मुकेश खन्ना यांनी तिच्या संस्कारावर वक्तव्य केले होते, ज्यानंतर अभिनेत्री संतापली. मुकेश खन्ना नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळे ते ट्रोल होतात तर अनेकदा त्यांचे कौतुकही होत असते. काही दिवसांपुर्वी मुकेश खन्ना यांनी केबीसीमध्ये हनुमानाशी संबंधित प्रश्नाचे उत्तर सोनाक्षीला देता आले नसल्याने तिच्यावर कमेंट केली होती. मुकेश खन्ना यांनी तिच्या संगोपनाबद्दल शत्रुघ्न सिंन्हा यांच्यावर वक्तव्य केले होते. सोनाक्षीला याबद्दल माहीती मिळाली आणि तिने मुकेश खन्ना यांना खडेबोल सुवानले. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने आपला संताप व्यक्त केला आहे. सोनाक्षीची ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. सोनाक्षीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहीले – मी नुकतेच तुमचे एक विधान वाचले ज्यामध्ये तुम्ही म्हटले होते की, रामायणाशी संबंधित प्रश्नाचे उत्तर मी योग्यरित्या देऊ शकले नाही ही माझ्या वडिलांची चुक आहे. मी खुप वर्षांपुर्वी या शोला गेले होते. मी तुम्हाला आठवण करुन देते की त्यावेळी माझ्यासोबत हॉटसीटवर अजुन दोन महिला उपस्थित होत्या, त्यांनाही या प्रश्नाचे उत्तर माहित नव्हते. पण तुम्ही फक्त माझेच नाव पुन्हा पुन्हा घेतले. शोवर झालेली चुक मान्य करत सोनाक्षी म्हणाली – हो त्या दिवशी मी ब्लँक झाले होते. संजीवनी बुटी कोणी आणली हे विसरणे ही मानवी प्रवृत्ती आहे परंतू प्रभू रामाची क्षमाशील शिकवण आपण विसरला आहेत असे वाटते. जर प्रभू राम मंथराला क्षमा करु शकतात, जर ते कैकेयीला क्षमा करु शकतात. जर ते युध्दानंतर रावणाला माफ करु शकतात, तर तुम्हीही या छोट्या गोष्टी सोडू शकतात. मला तुमच्या माफीची गरज नाही. सोनाक्षी पुढे म्हणाली, मी नक्कीच इच्छीते की तुम्ही विसरुन जावे आणि तीच घटना पुन्हा पुन्हा सांगणे थांबवावे, जेणेकरुन मी आणि माझे कुटुंब बातम्यांमध्ये येणार नाही. आणि शेवटी माझ्या वडिलांनी माझ्यावर जे संस्कार केलेले आहे त्यावर जर तुम्ही काहीही बोलायचे ठरवले… तर कृपया लक्षात ठेवा की त्याच संस्कारांमुळे मी सर्वकाही अतिशय आदराने सांगितले आहे. मी तुम्हाला शुभेच्छा देते, धन्यवाद आणि शुभेच्छा. सोनाक्षी सिन्हा.

Share

-