पत्नी, मुलीसह शिक्षकाची आत्महत्या, गंगाखेडमधील घटना:कारण अस्पष्ट, तिघेही झोपले रेल्वे रुळावर
गंगाखेड येथील शिक्षकाने पत्नी व मुलीसह, रेल्वे रुळांवर झोपून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. या सामूहिक आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. मसनाजी सुभाष तुडमे (४५), त्यांच्या पत्नी रंजना तुडमे (४०) व मुलगी अंजली तुडमे (२१, सर्व रा. किनी कहु. ता.अहमदपूर, ह.मु. बळीराजा कॉलनी, गंगाखेड) अशी मृतांची नावे आहेत. गंगाखेड शहरातील ममता माध्यमिक कन्या विद्यालयातील शिक्षकाने पत्नी व मुलीसह, रेल्वे स्टेशनपासून जवळच परभणीकडे जाणाऱ्या लोहमार्गावर, गोदावरी नदीवरील पुलाच्या पुढे आत्महत्या केली. तिघांनी रेल्वे रुळावर डोक ठेवले होते. कोळसा वाहतूक करणाऱ्या मालगाडीखाली तिघांचा मृत्यू झाला. खिशात आढळला रुमाल, दुचाकीची चावी, मोबाइल मृताच्या खिशात मोबाइल, पांढरा रुमाल, ३०० रुपये रोख व दुचाकीची चावी मिळाली. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणले.