स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरण:दत्तात्रय गाडेच्या वकिलांचा मोठा दावा; एकमेकांची महिनाभरापासून ओळख, दोघांत पैशांचा वाद

स्वारगेट बस डेपो मध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या वकिलांनी मोठा दावा केला आहे. या प्रकरणात दत्तात्रय गाडे आणि ती मुलगी एकमेकांना एक महिन्यांपासून ओळखत होते. दोघांमध्ये जे झाले ते संगनमताने झाले असून बलात्कार झाला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. ते दोघे एकाच बसमधून खाली उतरले, ते बस मधून कोठे गेले? याची माहिती घेण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. या दोघांमध्ये पैशांचा वाद झाला होता. त्यानंतर दत्तात्रय गाडे पळून गेल नाही तर तो त्याच्या गावी गेला होता. मात्र गावाला पोलिस छावणीचे रूप आल्याने तो लपून बसला, अशी माहिती देखील दत्तात्रय गाडे च्या वकिलांनी न्यायलयात दिली आहे. पुण्यात पार्क केलेल्या बसमध्ये 26 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या दत्तात्रय गाडेला गुरुवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. यानंतर, त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्याला 12 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे डीसीपी निखिल पिंगळे म्हणाले – शिरूर तहसील मधील गुणाट गावातून आरोपीला अटक करण्यात आली. तो उसाच्या शेतात लपला होता. यावेळी गावकऱ्यांनी आम्हाला मदत केली. आरोपी गावात असल्याचे गावकऱ्यांनीच सांगितले होते. रात्री त्याने एका घरातून पिण्याचे पाणी आणि अन्न मागितले. यावेळी लोकांनी त्याला ओळखले आणि पोलिसांना माहिती दिली. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आरोपीला रात्री 1:10 वाजता गुणाट गावातून अटक करण्यात आली. या प्ररकणी एका विशेष वकिलाची नियुक्ती केली जाईल. आम्ही केस लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. बलात्कारानंतर तो भाजीपाल्याच्या गाडीत बसून गावात गेला बलात्कार केल्यानंतर, आरोपी पुण्याहून भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये लपून त्याच्या गावी पळून गेला. घरी पोहोचल्यावर त्याने कपडे आणि बूट बदलले. यानंतर तो घरातूनही निघून गेला. पोलिसांना सूत्रांकडून माहिती मिळाली होती की आरोपी गावातीलच उसाच्या शेतात लपून बसला असावा. पोलिस ड्रोन आणि स्निफर डॉगच्या मदतीने त्याचा शोध घेत होते. आरोपीला पकडण्यासाठी 13 पोलिस पथके तयार करण्यात आली होती. डेपो मॅनेजरविरुद्ध चौकशीचे आदेश या घटनेनंतर, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सहाय्यक परिवहन अधीक्षक आणि बस डेपो व्यवस्थापकांविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी आढळल्यास त्यांना निलंबित केले जाईल, असे त्यांनी सांगितले. बस डेपोमध्ये तैनात असलेल्या जुन्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही काढून टाकण्याचे निर्देश त्यांनी दिले. पुणे शहर पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शाखा युनिटची 8 आणि स्वारगेट पोलिस स्टेशनची 5 पथके आरोपींचा शोध घेत होती. जिल्ह्याबाहेर ही पथके पाठवण्यात आली होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या की, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे. आरोपीने पीडितेला विचारले होते- ताई, तू कुठे चालली आहेस? पुण्याच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 वर्षीय महिला घरकाम करते. 25 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 वाजता ती तिच्या गावी जाण्यासाठी बसची वाट पाहत होती. आरोपीने तिच्या ताई कुठे चालली आहेस? पीडितेने सांगितले की मला माझ्या गावी जायचे आहे. यानंतर आरोपीने तीला सांगितले की, तुमची बस दुसऱ्या ठिकाणी उभी आहे. चला मी सोडून येतो. त्यानंतर पीडितेने नकार दिला. यावर आरोपी म्हणाला, मी 10 वर्षांपासून इथे आहे, मी तुम्हाला सोडून देतो. ती महिला सहमत झाली आणि त्याच्यासोबत बस पार्किंग क्षेत्राकडे गेली. त्या तरुणाने शिवशाही बसकडे बोट दाखवत तीला आत जाण्यास सांगितले. बसमध्ये लाईट नव्हती. यावर महिलेने संकोचून त्या तरुणाला विचारले – लाईट चालू नाहीये. त्या तरुणाने त्याला सांगितले की इतर प्रवासी झोपले आहेत, त्यामुळे अंधार आहे. ती बसमध्ये चढताच आरोपीने दरवाजा बंद केला आणि तिच्यावर बलात्कार केला. ही घटना सकाळी 5.30 वाजता घडली पुणे पोलिसांच्या म्हणण्यानुसार, घटनेनंतर, पीडिताने अस्वस्थ अवस्थेत तिच्या गावी जाण्यासाठी दुसरी बस पकडली. त्याआधी तीने एका मित्राला फोन करून सर्व सांगितले. नंतर त्यानेच तीला पोलिसांत तक्रार करण्यास सांगितले. ही घटना पहाटे 5.30 वाजता घडली. सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपी महिलेशी बोलताना दिसत आहे. आरोपी दत्तात्रेय रामदास गाडे अशी त्याची ओळख पटली आहे. त्याचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. शिवसेनेचा गोंधळ, बसेस ची तोडफोड या घटनेच्या निषेधार्थ, शिवसेना ठाकरे गटाने स्वारगेट बस डेपोची तोडफोड केली होती. आरोपींना अटक करण्यासोबतच वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ते करत आहेत. शिवसेनेव्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या समर्थकांनीही स्वारगेट पोलिस ठाण्यात निदर्शने केली. घटनेबद्दल नेत्यांची विधाने…