त्यांचा संजय राऊत होऊ नये एवढीच अपेक्षा:नीतेश राणे यांचा संजय शिरसाटांना टोला, रोहिंग्या मुलसमानांना मदत करणाऱ्यांना दिला इशारा
मला संधी मिळाली, तर मी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेन, असे विधान शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केले होते. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी संजय शिरसाटांच्या विधानावर प्रतिक्रिया देत त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नये एवढीच अपेक्षा आहे, असा टोला लगावला. आता संजय शिरसाट यावर काय उत्तर देतात, हे पाहावे लागणार आहे. भाजप आमदार आणि मंत्री नीतेश राणे आज चंद्रपूर दौऱ्यावर आहेत. चंद्रपूरमध्ये होणाऱ्या धर्म सभेत ते सहभागी होणार आहेत. त्यांना एकनाथ शिंदे यांची अस्वस्थतता तसेच मंत्री संजय शिरसाट यांच्या विधानाबद्दल प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडली. तसेच भारतातील बांगलादेशी घुसखोरांवर बोलताना हल्ला चढवला. संजय शिरसाट आमचे मित्र, पण…
संजय शिरसाट यांनी केलेले विधान हो ठीक आहे, तसे प्रयत्न करत रहावेत. पण त्या बद्दल एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांचे काय मत आहे, याबद्दल त्यांनी विचार करावा, असा सल्ला नीतेश राणे यांनी संजय शिरसाटांना दिला. तसेच ते आमचे मित्र आहेत. फक्त त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नये एवढीच अपेक्षा आहे, असा टोलाही राणे यांनी लगावला. कोणीही अस्वस्थ नाहीत, विरोधकांकडे काही काम नाही
एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत का? या प्रश्नावर नितेश राणे म्हणाले की, कोणी अस्वस्थ नाही. सगळे खुश आहेत. शिंदेसाहेब, अजितदादा, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आपआपल्या खात्याच काम संभाळतोय. आम्हाला महाराष्ट्र पुढे घेऊन जायचं आहे. विरोधकांकडे काही काम राहिलेले नाही. ते बरोजगार झाले आहेत. म्हणून त्यांनी बेरोजगार संस्थेत नोंदणी करावी. आमचे सरकार त्यांना काहीतरी काम देईल. रोहिंग्या मुसलमानांना मदत करणाऱ्यांची नावे सरकारकडे
नीतेश राणे यांनी रोहिंग्या मुलसमानांना मदत करणाऱ्यांनी इशारा दिला. महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या कोणत्याही रोहिंग्या मुसलमानांना आम्ही राहू देणार नाही. मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या राज्यात सर्वत्र बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई सुरु आहे. मात्र पुढीलकाळात या कारवाईचा वेग अधिक तीव्र केला जाणार, असे नीतेश राणे म्हणाले. सरकारी यंत्रणेत जे अधिकारी खोटी कागदपत्र करण्यास रोहिंग्या मुसलमानांना मदत करतात, त्यांची नाव सरकारकडे आली आहे. त्यांच्यावर पण कारवाई केली जाणार, असेही ते म्हणाले. हे ही वाचा… ‘सामना’ हे काँग्रेसचे मुखपत्र झाले:शिवसैनिकही वाचत नाहीत, त्यामुळे त्याची दखल घेण्याची गरज नाही; नीतेश राणेंची संजय राऊतांवर टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विसंवाद आहे. त्यामुळे सरकारकडे मोठे बहुमत असूनही राज्य अस्थिर आहे, असा दावा संजय राऊत यांनी सामनातील रोखठोकमधून केला. शिंदे गटाचे एक आमदार विमान प्रवासात भेटले, त्यांनी दिलेल्या माहितीमुळे गोंधळ अजून वाढला, असे त्यांनी म्हटले. यावरून भाजप आमदार नीतेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले. सामना आजकाल शिवसैनिक देखील वाचत नाही. कारण ते काँग्रेसचे मुखपत्र झालेले आहे. त्यामुळे त्याची दखल घेणे गरजेचे वाटत नसल्याचे नीतेश राणे म्हणाले. दुसऱ्याच्या घरात डोकावण्यापेक्षा स्वत:च्या पक्षाची लायकी आणि स्वत:च्या पक्षात स्वत:चे स्थान त्यांनी पाहावे, असा घणाघात राणे यांनी केला. पूर्ण बातमी वाचा… दोन्ही शिवसेना एकत्र आणण्याची वेळ आली:एकनाथ शिंदे – ठाकरेंना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार; मंत्री संजय शिरसाट यांचे विधान आता जोडण्याची वेळ आली असून अद्याप दोघांमधले अंतर वाढले नाही. त्यामुळे दोन्ही शिवसेना जोडता येतील, असे विधान समाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे दोन्ही शिवसेना एकत्र येणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. पूर्ण बातमी वाचा…