कपाळे परिवारात माणुसकी अन् दातृत्वाचीही भावना:व्याख्याते राहुल गिरी

प्रतिनिधी | राहुरी साई आदर्श मल्टिस्टेटने एक तपाच्या प्रवासात सर्वसामान्याचा विश्वास संपादन करून सामाजिक दायित्व स्वीकारले आहे. दातृत्व व माणुसकीची भावना शिवाजीराव कपाळे व परिवारात आहे, असे प्रतिपादन व्याख्याते राहुल गिरी यांनी केले. राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टिस्टेटच्या वर्धापनदिना निमित्त उद्याची पिढी घडवताना या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. गिरी म्हणाले साई आदर्श संस्थेने एक तप पूर्ण केले.तप उलटे केलें तर ‘पत’ शब्द तयार होतो.संस्थेने एक तप म्हणजे खऱ्या अर्थाने पत निमार्ण झाली आहे.यावेळी साई आदर्शच्या वतीने पोलीस दलात निवड झालेल्या आरोग्य, प्रशासन व सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या मंडळींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, माजी सभापती सचिन गुजर, बाबासाहेब दिघे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र वाघ, विष्णुपंत गीते, आबासाहेब वाळुंज उपस्थित होते. राहुरी फॅक्टरी येथे सहकारी संस्थांबाबत व्याख्याते राहुल गिरी यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले.