बांगर यांना आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पाठवले विमान:हैदराबादहून मुंबईला रवाना, राजकीय वर्तुळात मंत्रिपदाची चर्चा
कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांना तातडीने मुंबईला येण्याचे आदेश मिळाले. त्यांना घेऊन जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांनी हैदराबाद येथे खासगी विमान पाठवले आहे.रविवारी सायंकाळी तेमुंबईकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांचे विश्वासू आमदारम्हणून आमदार संतोष बांगर यांची ओळखआहे. नुकत्याच झालेल्या विधानसभानिवडणुकीत आमदार बांगर यांनी एकहातीविजय मिळवला. हिंगोली येथे शनिवारीमारहाणीमध्ये आमदार बांगर यांचे पुतणे गौरवबांगर यांना पोटात गोळी लागली. गौरवयांच्यावर हैदराबाद येथे रुग्णालयात उपचारसुरु अाहेत. त्यांच्या देखभालीसाठी आमदारबांगर यांच्यासह त्यांचे कुटुंबिय हैदराबाद येथेथांबले आहेत. दरम्यान, रविवारी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी तातडीने त्यांना मुंबईतपोहोचण्याचे आदेश दिले. त्यांना हैदराबादयेथून मुंबईला येण्यासाठी खासगी विमानहीपाठविले. त्यामुळे दुपारी खासगी विमानहैदराबाद विमानतळावर पोहोचले. त्यानंतरसायंकाळीच आमदार बांगर मुंबईला रवानाझाले. त्यांना तातडीने मुंबईला येण्याचा आदेशमिळाल्यामुळे आमदार बांगर यांचीमंत्रीमंडळात वर्णी लागेल, अशी चर्चा सुरुझाली आहे. मतमोजणीपुर्वीच आमदार बांगरयांचे भावी मंत्री म्हणून बॅनर झळकले होते. मंत्रिमंडळ स्थापनेची लगबग महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर आताआमदारांना तातडीने मुंबईला बोलावले जातआहे. त्याच पार्श्वभूमीवर बांगर यांनाही मुंबईलाबोलावल्याने पुढील निर्णयाकडे हिंगोलीजिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.