कायम चर्चेत असेलेले IRS अधिकारी समीर वानखेडे यांचा राजकारणात प्रवेश:विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता

महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले प्रसिद्ध IRS अधिकारी समीर वानखेडे राजकारणात उतरणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होईल. समीर वानखेडे हे मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. समीर वानखेडेच्या राजकारणात उतरणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर शिवसेनेत एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. समीर वानखेडे मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. वास्तविक, राजकारणात येण्यापूर्वी समीर वानखेडे यांना आयआरएस पदाचा राजीनामा द्यावा लागणार असून हा राजीनामा केंद्र सरकारच्या गृह विभागाला स्वीकारावा लागणार आहे. त्यानंतर राजकारणातील प्रवेशाचा मार्ग मोकळा होईल. 44 वर्षीय समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस अधिकारी आहेत. 2021 पर्यंत त्यांनी मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे झोनल डायरेक्टर म्हणून काम केले. एनसीबीमध्ये रुजू होण्यापूर्वी वानखेडे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि एअर इंटेलिजन्स युनिटमध्ये काम केले होते. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत, वानखेडे यांनी अमली पदार्थांच्या अंमलबजावणीशी संबंधित कायदा अंमलबजावणी संस्थांमध्ये विविध पदांवर काम केले आहे. समीर वानखेडे हे छापे, गुप्तचर कारवाया आणि अंमली पदार्थांचे तस्कर आणि त्यांच्या नेटवर्कला लक्ष्य करून गुप्त तपास करण्यात सक्रियपणे सहभागी आहेत. आपल्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत 17,000 किलो अंमली पदार्थ आणि 165 किलो सोने जप्त करण्याचे श्रेय त्यांना जाते. काही प्रकरणांमुळे आले चर्चेत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद टोळीचे ड्रग्जचे संबंध तोडणे, इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईकविरुद्ध मनी लाँड्रिंगचा खटला, कस्टम चोरी प्रकरणात गायक मिका सिंग, कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला तुरुंगात टाकणारे समीर वानखेडे यांचा समावेश अनेक महत्त्वाच्या प्रकरणात दिसून आला आहे. काँग्रेसच्या विद्यमान खासदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या धारावी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. वर्षा गायकवाड यांना आपल्या बहिणीला या जागेवर काँग्रेसकडून उमेदवारी द्यायची आहे. आता या जागेवरून समीर वानखेडे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. कोण आहेत समीर वानखेडे? समीर वानखेडे 2008च्या बॅचचे भारतीय महसूल सेवेतील अधिकारी आहेत. भारतीय महसूल सेवेत येण्याआधी 2006 साली ते पहिल्यांदा केंद्र सरकारच्या सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशनमध्ये रूजू झाले होते. CPO मध्ये केंद्रीय गुप्तचर विभाग, सीबीआय, नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्यूरो, नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स, नॅशलन इनव्हेस्टिगेटिंग एजेंसी यांसारखे विविध विभाग येतात. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाल्यानंतर समीर वानखेडे भारतीय महसूल सेवेत रुजू झाले.भारतीय महसूल सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांची नियुक्ती कस्टम विभागात करण्यात आली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहायक आयुक्त म्हणून समीर वानखेडे यांनी काही वर्षं काम केले.त्यानंतर महसूल गुप्तचर संचलनालय आणि दहशतवादी कारवायांशी संबंधित प्रकरणांचा तपास करणाऱ्या नॅशनल इनव्हेस्टिगेटिंग एजन्सीतही त्यांनी काम केले आहे. ऑगस्ट 2020 मध्ये समीर वानखेडे यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई विभागाचे संचालक म्हणून कार्यभार स्वीकारला होता. त्याच वर्षी वानखेडे यांना केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे उत्कृष्ठ तपासासाठीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. समीर वानखेडेंची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? आम्ही ही बातमी अपडेट करत आहोत… राज्यातील इरतही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. भाजपच्या प्रचारासाठी संविधानाचा चुकीचा वापर:न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी काढण्यावरून संजय राऊत बरसले; हातात तलवार ऐवजी संविधान दिल्यावरूनही टीका लोकसभा निवडणुकीत भारतातील जनतेने मोदींचे बहुमत काढून टाकले. त्यावेळी संविधान वाचवण्याचा लढा आम्ही दिला होता. त्यामुळेच आता न्यायालयातील काहींनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टीत काढून टाकली असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे आता न्यायदेवता उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पाहणार आहे, अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला. न्यायदेवतेच्या हातातील तलवार काढून संविधान देण्यात आले आहे. हा भाजपचा प्रचार असून आएसएसचा अजेंडा असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. पूर्ण बातमी वाचा… लाडकी बहीण योजना हलक्यात घेऊ नका:सरकार आल्यास दीड ऐवजी 3 हजार देऊ असे सांगा; श्याम मानव यांचा आघाडीच्या नेत्यांना सल्ला विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यात आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हलक्यात घेऊ नका, या योजने विरोधात न बोलता महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आम्ही महिलांना दीड हजार रुपयांऐवजी दोन हजार रुपये देऊ, असे सांगा, असा सल्ला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी महाविकास आघाडीला दिला आहे. पूर्ण बातमी वाचा… मतदारांना विकत घेण्याचा युतीचा प्रयोग:तर न्यायालये देखील कोणाची तरी ‘जी हुजुरी’च करत आहेत; उद्धव ठाकरे गटाचा हल्लाबोल पुढील महिन्यात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होतील व त्या सध्याच्या भ्रष्ट तसेच घटनाबाहय़ सरकारविरुद्ध ईर्षेने लढवल्या जातील. महाराष्ट्र राज्याची इभ्रत ईरेला लागली आहे व मऱ्हाठी जनता पेटून उठली आहे. त्यामुळे राज्यात सत्तांतर घडविण्यासाठीच या निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली. दिल्लीवाल्यांची सोय पाहूनच आता निवडणुकांच्या तारखा घोषित होतात. तशा त्या महाराष्ट्रातही झाल्या. युद्धाचे रणशिंग फुंकले गेले आहे. महाराष्ट्रासाठी हा लढा जिंकू किंवा मरू असाच आहे, पण हरण्याचे नावच नको. लढू आणि जिंकू. जिंकावेच लागेल! असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने दैनिक सामनाच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला आहे. पूर्ण बातमी वाचा…

Share

-