सैफवरील हल्ल्यावर शंका उपस्थित करण्याची आवश्यकता नव्हती:चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्री नितेश राणेंसह संजय निरुपम यांनाही सल्ला

अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर तो घरी परतला, त्यावेळी जास्त जखमी झालेला दिसत नव्हता. असे म्हणत त्याच्यावर झालेला हल्ला अभिनय होता का? असा प्रश्न मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला होता. तर शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी देखील यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या दोघांनाही सल्ला दिला आहे. सैफ अली खानावरील हल्ल्यावर शंका उपस्थित करण्याची आवश्यकता नव्हती, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. नागपूर येथील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा सल्ला दिला आहे. या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी शंका उपस्थित करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. सैफ अली खान याच्यावर हल्ला झाल्यानंतर लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले होते. डॉक्टरांनी केलेल्या उपचारावर शंका घेण्याची आवश्यकता नसल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. या संदर्भात नितेश राणे यांनी केलेल्या आरोपाला एका अर्थाने त्यांनी प्रत्युत्तरच दिले आहे. नेमकी काय म्हणाले होते नितेश राणे अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याचा भाजप नेते आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री नितेश राणे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याची खिल्ली उडवत नितेश राणे म्हणाले की, हा खरोखर चाकू हल्ला होता की, अभिनय होता. ते म्हणाले की, बघा हे घुसखोर बांगलादेशी मुंबईत काय करत आहेत. त्यांची हिम्मत बघा. पूर्वी ते रस्त्यावर राहायचे, आता ते लोकांच्या घरात घुसत आहेत. सैफ अली खानच्या घरातही त्यांनी प्रवेश केला. त्याच्यावर चाकूने हल्ला झाला हे खरे होते की अभिनय होता? असा संशय व्यक्त केला जात आहे. सैफ रुग्णालयातून निघाल्यावर कसा टुन-टुन उड्या मारत घरात जात होता, अशा शब्दात त्यांनी या प्रकरणावर संशय व्यक्त केला आहे. संजय निरुपम यांनी देखील उपस्थित केली होती शंका याआधी शिवसेना नेते संजय निरुपम यांनीही सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. त्याने सोशल मीडिया साइट ‘X’ वर पोस्ट करत लिहिले की, “डॉक्टरांनी सांगितले की , चाकू सैफ अली खानच्या पाठीत 2.5 इंच खोलवर घुसला होता. बहुधा तो आत अडकला असावा. ऑपरेशन सतत 6 तास चालले. हे सर्व 16 जानेवारीला 21 जानेवारी आहे, फक्त 5 दिवसात फिट? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी एका ट्विटद्वारे याविषयी शंका उपस्थित केली. डॉक्टरांनी सांगितले होते की, सैफ अली खानच्या पाठीत चाकू 2.5 इंचापर्यंत खोलवर घुसला होता. सामान्यतः तो आतमध्ये अडकला होता. सलग 6 तास शस्त्रक्रिया झाली. ही सर्व 16 जानेवारीची गोष्ट आहे. आज 21 जानेवारी आहे. रुग्णालयातून बाहेर येताच एवढा फिट? केवळ 5 दिवसांत? कमाल आहे, असे निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. संजय निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये सैफचा घरी आल्याचा व्हिडिओही जोडला होता. अजित पवारांनीही दिले उत्तर या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मंत्री नीतेश राणे यांनी काय म्हटले याबद्दल मला माहिती नाही. पण त्यांच्याशी मी या विषयी चर्चा करणार आहे. एखाद्याच्या मनात वेगळे काही आले तर ते त्याचे मत आहे. त्यांच्या मनात वेगळे काही असेल तर पोलिस खात्याला सांगावे. मी पण पोलिस खात्याला सांगेन की एखाद्याच्या मनात शंका-कुशंका आहेत. अजित पवार म्हणाले की, नीतेश राणे म्हणतात तसे आतापर्यंतच्या माहितीत तसे काही क्लू मिळालेले नाही. कदाचित सैफ अली खान आपल्या घरी जात असताना त्यांची तब्येत किंवा त्यांचे कपडे पाहता, यांच्यावर काही दिवसांपूर्वी असा हल्ला झाला होता, असे वाटले नसेल, पण त्यांची तब्येत चांगली असली तरी ते घडलंयच ना. पोलिसांनी आरोपीला तिथे नेत माहिती घेतली असता त्याला इथे केवळ श्रीमंत लोकं राहतात हे माहिती असल्याचे आरोपीने सांगितले. या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा…. सैफ अली खानावर हल्ला झाला खरे होते की अभिनय होता?:मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली शंका अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याचा भाजप नेते आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री नितेश राणे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याची खिल्ली उडवत नितेश राणे म्हणाले की, हा खरोखर चाकू हल्ला होता की, अभिनय होता. ते म्हणाले की, बघा हे घुसखोर बांगलादेशी मुंबईत काय करत आहेत. त्यांची हिम्मत बघा. पूर्वी ते रस्त्यावर राहायचे, आता ते लोकांच्या घरात घुसत आहेत. सैफ अली खानच्या घरातही त्यांनी प्रवेश केला. त्याच्यावर चाकूने हल्ला झाला हे खरे होते की अभिनय होता? असा संशय व्यक्त केला जात आहे. सैफ रुग्णालयातून निघाल्यावर कसा टुन-टुन उड्या मारत घरात जात होता, अशा शब्दात त्यांनी या प्रकरणावर संशय व्यक्त केला आहे. पूर्ण बातमी वाचा…

Share

-