जळगाव रेल्वे दुर्घटनेमागे तीन शक्यता:रेल्वेच्या चाकांमधून निघालेला धूर, ट्रॅक सिक्योरिटी प्रोटोकॉलसह साखळी ओढण्याबाबत प्रश्न उपस्थित
जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वे स्थानकालगत भीषण अपघात घडला. कर्नाटक एक्सप्रेसने अनेक प्रवाशांना उडवले. ही घटना बुधवारी सायंकाळी 4 च्या सुमारास घडली. यासंबंधीच्या माहितीनुसार, पुष्पक रेल्वेने अचानक ब्रेक लावल्यामुळे तिच्या चाकांमधून ठिणग्या उडल्या होत्या. त्यानंतर रेल्वेला आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे प्रवाशांनी जिवाच्या आकांताने खाली उड्या मारल्या. पण त्याचवेळी दुसऱ्या ट्रॅकवरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने त्यांना उडवले. त्यात 12 जणांचा मृत्यू झाला, तर 40 प्रवासी जखमी झाले आहेत. या दुर्घटनेबाबत तीन शक्यता वर्तवण्यात येत आहेत. 1. रेल्वेच्या चाकांमधून निघालेला धूर
ब्रेक मारल्यानंतर रेल्वेच्या चाकांमधून धूर निघाला होता. या निघालेल्या धुरामुळेच आग लागली असावी, असे प्रवाशांना वाटले आणि त्यांनी ते डब्याबाहेर पडले. चाकांमधून निघालेला धुराची तपासणी करायला पाहिजे. ही यांत्रिक समस्या होती का?, ट्रेनच्या देखभालीतील दुर्लक्षामुळे ट्रेनमध्ये छेडछाड झाली होती का? या सर्व बाबींचा तपाण व्हायला पाहिजे. 2. प्रवाशांनी साखळी ओढणे
धावत्या रेल्वेत साखळी ओढण्याचा प्रकार ही नेहमीचीच समस्या आहे. असा प्रकार वारंवार समोर येत असतो. आजच्या घटनेतही साखळी ओढणे हे देखील कारण असल्याचे समोर आले. पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवाशांनी साखळी का ओढली? प्रवाशांनी साखळी ओढण्यामागे नेमके काय कारण होते? ते थांबवता आले असते का? याचीही चौकशी व्हायला हवी. 3. ट्रॅक सिक्योरिटी प्रोटोकॉल
या दुर्घटनेमध्ये ट्रॅक सिक्योरिटी प्रोटोकॉल देखील एका कारण आहे. पुष्पक एक्सप्रेस थांबल्यानंतर इमरजन्सीवेळी कर्नाटक एक्सप्रेसला तेथून जाण्यापासून रोखण्यासाठी जवळचा ट्रॅक का सुरक्षित केला गेला नाही? रेल्वे वाहतुकीचे व्यवस्थापन का करण्यात आले नाही? याची देखील चौकशी व्हायला हवी. हे ही वाचा… हृदय पिळवटून टाकणारा अपघात, VIDEOS:स्ट्रेचरच्या कमतरतेमुळे प्रियजनांनी चादरीत गुंडाळून नेले मृतदेह लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरल्याने प्रवाशांनी रेल्वेतून खाली उड्या मारल्या. पण याचवेळी उलट दिशेने येणाऱ्या रेल्वेगाडीखाली चिरडून या प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ घडली. अपघातानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली, पण स्ट्रेचरच्या कमतरतेमुळे लोक त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह चादरीत गुंडाळून न्यावे लागले. पाहा या हृदयद्रावक घटनेचे व्हिडिओ…