अडीच वर्षांपूर्वी माझ्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी केली होती शिफारस:आता त्यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी आम्हाला संधी, एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

महायुतीच्या नेत्यांनी आज मुंबईतील राजभवनात राज्यपालांकडेसत्ता स्थापनेसाठी दावा केला आहे. महायुतीकडून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या सत्ता स्थापनेच्या दाव्यानंतर पत्रकार परिषदेत महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंद केले आहे तसेच पाठिंबा देखील दर्शवला आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, आज आम्ही राज्यपाल महोदयांची भेट घेऊन महायुतीचे सरकार स्थापन करण्याची परवानगी मागितली. उदय आझाद मैदानात साडे पाच वाजता शपथविधी आहे. आम्ही तुम्हा सर्वांना आमंत्रित करतोय. इथेच मी मुख्यमंत्री व्हावे म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षांपूर्वी केली होती आणि आज ते मुख्यमंत्री व्हावेत म्हणून आम्ही शिवसेना पक्षाकडून केली आहे. गावी गेलो तरी तुम्ही काय काय चालवत असता असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. अगदी खेळीमेळीचे वातावरण महायुतीमध्ये आहे. प्रचंड बहुमताने महायुतीने विजय मिळवला आहे. लाडकी बहीण आणि सर्वसामान्य जनतेने यांच्यावर प्रचंड मतांचा वर्षाव केला. राज्य चालवताना अनेक निर्णय आम्ही घेतले, जे विकासकामे महाविकास आघाडीने थांबवले होते, आमचे सरकार आल्यावर आम्ही ते मार्गी लावले. सरकार सर्वसामान्यांसाठी असते आणि आम्ही ते तंतोतंत पालन करण्याचे आम्ही अडीच वर्ष प्रयत्न केले. सरकारच्या माध्यमातून एक आधार म्हणून आम्ही भूमिका पार पाडली, असे शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे म्हणाले, डबल इंजिनचे सरकार आम्ही अडीच वर्ष चालवले आणि जनतेने आम्हाला पाठिंबा दिला. या निवडणुकीत सगळ्या एजन्सीचे अंदाज आम्ही बाद ठरवले. अडीच वर्ष आम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्या अनुभवाचा फायदा झाला तसेच आता ते मुख्यमंत्री होणार आहेत त्याला आमचा पाठिंबा आहे. आम्ही फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून शिफारस केली. देवेंद्र फडणवीस यांचे मी मनापासून अभिनंदन करतो.

Share

-