उद्धव ठाकरे, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, राज ठाकरेंना निमंत्रण:सर्वांना येण्याची भाजपची विनंती; तर उपस्थितीतीबाबत साशंकता

सरकारच्या वतीने सर्वांना शपथविधी साठी निमंत्रण दिलेले आहे. हा सरकारचा प्रोटोकॉल असतो. प्रोटोकॉल नुसार सर्वांना निमंत्रण गेले आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस हे देखील अनेकांशी बोलले आहेत. विरोधकांनी देखील महाराष्ट्राच्या विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन भाजपचे प्रदेशातील अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, राज ठाकरे अशा सर्व नेत्यांना माझी विनंती आहे की, महाराष्ट्राचा विकासाचा प्रश्न आहे. निवडणुका संपल्या आहेत. राजकारण संपले आहे. त्यामुळे पक्षाचा अध्यक्ष म्हणून या सर्वांना शपथविधीला उपस्थित राहण्याची विनंती करत असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे सर्व नेत्यांनी तसेच विरोधी पक्षाच्या सर्व आमदार, पदाधिकाऱ्यांनी शपथविधीला उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. सरकार आल्यानंतर विरोधी पक्षाचा नेता असेल तरी त्याचे काम देखील करून दिले पाहिजे. विकास हा सर्वांसाठी सारखा असला पाहिजे, असे देखील बावनकुळे यांनी म्हटले आहे. सरकार म्हटले तर सर्वांनीच विकासाच्या मुख्य प्रवाहात यायला हवे, असे देखील बावनकुळे यांनी म्हटले आहे. हा पक्षाचा कार्यक्रम नाही महाराष्ट्र सरकारचा शपथविधी आहे. त्यामुळे सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बावनकुळे यांनी केले आहे. सध्यातरी तिघांचाच शपथविधी सध्या तरी एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील, असेच चित्र दिसत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. संध्याकाळपर्यंत वरिष्ठांनी काही निर्णय घेतला तर माहीत नसल्याचे बावनकुळे यांनी म्हटले. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शपथ घेतली तरी राज्यात सरकार स्थापन झाले असा त्याचा त्याचा अर्थ होतो. पुढील काळात सर्व नेते एकत्र बसून निर्णय घेणार असल्याचे देखील बावनकुळे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष शरद पवार आणि संजय राऊत हे दिल्लीत असल्याने शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे हे मुंबईतच आहेत. पण ते शपथविधीला उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Share

-