रासेयो अंतर्गत शेतकऱ्यांसाठी डिजिटल जागृती मोहीम राबवा:ओबीसी किसान महासंघाच्या वतीने कुलगुरूंना देण्यात आले निवेदन

प्रतिनिधी | अमरावती शेतकऱ्यांमध्ये डिजिटल साक्षरता जागृत करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून शेतकरी व ग्रामीण भागातील जनतेला प्रशिक्षित करावे. असे भावनिक आवाहन विद्यापीठच्या कुलगुरूंना शेतकरी पुत्र तथा जिल्हा परिषद माजी प्रकाश साबळे, युवा नेते समीर जवंजाळ, मंगेश काळमेघ यांच्या नेतृत्वात व राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाच्या वतीने निवेदन दिले. शेतकऱ्यांमध्ये डिजिटल साक्षरतेचा अभाव, आर्थिक अस्थिरता, आणि माहितीच्या अभावामुळे त्यांच्यावर फसवणुकीचे संकट उभे राहिले आहेत. भारतामध्ये आर्थिक फसवणुकीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्याचा फटका सर्व समाजघटकांना बसत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग या फसवणुकीचे शिकार होत आहेत. आजच्या डिजिटल युगात, जरी तंत्रज्ञानाने अनेक सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. तरीही त्याच तंत्रज्ञानाचा गैरवापर करून आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शेतकऱ्यांचे डिजिटल साक्षरतेचे अभाव, आर्थिक अस्थिरता, आणि माहितीच्या अभावामुळे त्यांच्यावर फसवणुकीचे संकट निर्माण झाले आहे. शेतकरीवर्ग या गंभीर परिस्थितीत, राष्ट्रीय सेवा योजना सारख्या उपक्रमांना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येणे आवश्यक आहे. यासाठी शेतकरी पुत्रांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कुलगुरुना भेटून निवेदन देण्यात आले. यावेळी सतीश तुडे, आकाश गडपाल, अक्षय सरोदे, पवन पाटणकर आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांना जनजागृती गरज राष्ट्रीय सेवा योजना ही एक शक्तिशाली माध्यम आहे, जे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक दायित्व वाढवते आणि त्यांना समाजाच्या सुधारण्यासाठी प्रेरित करते. शेतकऱ्यांना फसवणुकीपासून वाचविण्यासाठी डिजिटल साक्षरतेचे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. एनएसएस विभागामार्फत हे काम अत्यंत प्रभावीपणे केले जाऊ शकते. असा दावा शेतकरी पुत्रांनी केला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यामार्फत शेतकऱ्यांना जनजागृती करावी.

Share

-