हमास-इस्रायल युद्धबंदी लवकर; बायडेन-ट्रम्प यांच्यामध्ये श्रेयवाद:कतारमध्ये अमेरिकी मध्यस्थतेत पहिल्यांदाच चर्चा

हमास व इस्रायलमध्ये १५ महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. दरम्यान, हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धविराम प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केली आहे. या आठवड्यात हा करार जाहीर केला जाईल. हा करार पूर्ण करण्यासाठी बायडेन प्रयत्नशील आहेत. त्याचवेळी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील या संभाव्य कराराचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हा करार घडवण्यात हमास-इस्रायल व्यतिरिक्त अमेरिका, इजिप्त आणि कतार यांचा सहभाग आहे. चार टप्प्यांत राबविण्यात येणाऱ्या युद्धबंदी करारात हमास ओलिसांची सुटका करेल, बफर झोन तयार होईल व इस्रायल एक हजार पॅलेस्टिनींची सुटका करेल. युद्ध करारात प्रथमच, इस्त्रायली व हमास शिष्टमंडळे कतारमधील एकाच इमारतीत अप्रत्यक्ष चर्चा करत आहेत, असे,बैठकीशी संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. हमासच्या कब्जात ३४ इस्रायली| ऑक्टोबर २०२३ ला हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. यात २०० इस्रायलींचे अपहरण केले. ३४ अद्यापही हमासच्या ताब्यात आहेत. चार टप्प्यांत लागू होईल हस्रायल-हमास करार इस्रायल आणि हमासदरम्यानची युद्धबंदी चार टप्प्यांत लागू होईल. पहिला टप्पा- कराराच्या पहिल्या दिवशी हमास तीन ओलिसांची सुटका करेल यावर दोन्ही पक्ष सहमत झाले आहेत. दुसरा टप्पा- युद्धबंदी लागू होण्याच्या ७ दिवसांनंतर हमास आणखी ४ ओलिसांची सुटका करेल. यानंतर इस्रायल उत्तर गाझातून निर्वासित होऊन दक्षिणेत राहणाऱ्या पॅलिस्टीनींना परत येण्याची परवानगी देईल. या करारात पूर्व आणि उत्तर सीमांवर ८०० मीटरचे बफर झोन करण्याची तरतूद आहे. हे ४२ दिवस चालेल. यात इस्रायली सैनिकांना फिलाडेल्फी कॉरिडॉरमध्ये थांबण्याची परवानगी असेल. तिसऱ्या व चौथ्या टप्प्याची चर्चा युद्धबंदी कराराच्या १६ व्या दिवशी सुरू होईल. विदेश धोरणावर निरोपाचे भाषण, चीन कधी अमेरिकेच्या पुढे जाणार नाही : बायडेन बायडेन यांचा कार्यकाळ १९ जानेवारीला संपणार आहे. याआधी त्यांनी परराष्ट्र धोरणावर निरोपाचे भाषण केले. त्यांनी चीनची अर्थव्यवस्था कधीही अमेरिकेला मागे टाकू शकणार नाही, असे म्हटले आहे. अमेरिका जगभरातील स्पर्धा जिंकत आहे. मी अमेरिकेची शक्ती प्रत्येक परिमाणात वाढवली आहे. बुधवारी त्यांचे निरोपाचे भाषण होणार आहे.

Share

-