‘कसौटी जिंदगी की’चे लेखक महेश पांडेंना अटक:निर्मात्याने 2.65 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता
एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की’ या शोचे स्क्रिप्ट रायटर महेश पांडेंना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. निर्माते जतीन सेठी यांची 2.65 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून शुक्रवारी त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश पांडे यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत आंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले- जतिन सेठी यांनी दिलेल्या...