नेपाळने चिनी कंपनीला दिले नोटा छापण्याचे कंत्राट:100 रुपयांच्या 30 कोटी प्रती छापल्या जातील, नोटेवरील नकाशात 3 भारतीय भाग
नेपाळची मध्यवर्ती बँक ‘नेपाळ राष्ट्र बँक’ ने 100 रुपयांच्या नव्या नेपाळी नोटा छापण्यासाठी एका चिनी कंपनीला कंत्राट दिले आहे. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, या नोटांवरील नकाशात भारतातील लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कालापानी भाग नेपाळचा भाग म्हणून दाखवण्यात आले आहेत. या क्षेत्राबाबत भारत आणि नेपाळमध्ये सुमारे 35 वर्षांपासून वाद आहे. रिपोर्टनुसार, चीनच्या ‘बँक नोट प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन’ या कंपनीला नोटा छापण्याचे...