न्यायाधीश महोदयांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना पकडले:न्यायपालिकेच्या विश्वासाला हादरा देणारी घटना

न्यायपालिकेच्या विश्वासाला हादरा देणारी घटना सातारा जिल्ह्यातून समोर आली आहे. न्यायालय परिसरात न्यायाधीश महोदयांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले आहे. साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे या घटनेची आता राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे. यात फिर्यादीच्या वडिलांच्या जामीनासाठी लाच मागण्यात आली होती. वास्तविक आपल्यावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचार विरोधात न्याय मागण्यासाठी सर्वसामान्य नागरिक न्यायालयाचा दरवाजा ठोठावत असतो. अशावेळी पुणे आणि सातारा अँटी करप्शन विभागाने संयुक्तपणे कारवाई करत सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश महोदयांनाविरोधच गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. त्यानंतर यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. यामध्ये न्यायाधीश महोदयांसाठी पाच लाख रुपयांची लाच घेताना तिघांना रंगेहात पकडल्याने न्यायपालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जामीन देण्यासाठी मागितली होती लाच या घटनेतील फिर्यादीच्या वडिलांना जामीन देण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातच या घटना घडामोडी घडत होत्या. येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्वांना रंगेहात पकडले. मात्र या सर्व घटनेमुळे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विश्वास कोणावर ठेवावा? सर्वसामान्यांसाठी शेवटचे आश्वासक ठिकाण असलेल्या न्यायपालिकेवरील विश्वासाला या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात तडा केला आहे. पोलिस यंत्रणेकडून अन्याय झाला तरी न्यायालयात आपल्याला दाद मिळेल, न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेल्या न्यायमूर्तींकडून आपल्यावर झालेला अन्याय दूर होईल, अशी सर्व सामान्य नागरिकांची भावना असते. मात्र, आता न्यायाधीश यांच्यावरच लाच घेतल्याचा आरोप करण्यात आल्यामुळे आता विश्वास कोणावर ठेवायचा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वास्तविक पोलिस प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या घटना सातत्याने समोर येत असतात. मात्र, आता न्यायपालिकेतील न्यायाधीश अशा प्रकरणात अडकल्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

Share

-