अमेरिकेत 1 लाख भारतीय नागरिकांची नोकरी संकटात:डीईआय भरतीवर बंदी, 31 पर्यंत सक्तीच्या पगारी रजेवर पाठवले
अमेरिकेत ट्रम्प राजवटीचे दुष्परिणाम समोर येताहेत. डीईआय (विविधता, समानता आणि समावेश) कार्यक्रम बंदच्या आदेशामुळे एक लाख भारतीयांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डीईआय नियुक्तीवर स्थगिती देत सर्व डीईआय कर्मचाऱ्यांना ३१ जानेवारीपर्यंत पगारी रजेवर पाठवले. राज्यांमधील डीईआय कार्यालये बंदचे केली. १ फेब्रुवारीला डीईआय कर्मचाऱ्यांच्या भवितव्याबाबत निर्णय घेईल. सर्व फेडरल कार्यालयांकडून तसा अहवाल मागवला आहे. अमेरिकेत एकूण ३२ लाख फेडरल कर्मचारी आहेत. त्यापैकी ८ लाख कर्मचारी डीईआय कार्यक्रमांतर्गत काम करतात. पैकी एक लाख भारतीय आहेत. यात अमेरिकेचे नागरिकत्व मिळालेल्या आणि एच-1बी व्हिसावर काम करणाऱ्यांचा समावेश आहे. अर्धवेळ नोकरी करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश नाही. ट्रॅव्हल व्हिसावर जाणाऱ्यांना रिटर्न तिकीट दाखवण्याची सक्ती आता ट्रॅव्हल व्हिसावर अमेरिकेला जाणाऱ्यांसाठी विमानतळावर रिटर्न तिकीट दाखवण्याची सक्ती सुरू केली. एका वृद्ध भारतीय जोडप्याला परतीचे तिकीट नसल्याने नेवार्क एअरपोर्टवरून परत पाठवले. ते मुलाकडे पाच महिने थांबण्याच्या उद्देशाने गेले होते.दांपत्याचा दावा आहे की, इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना जानेवारीपासून परतीचे तिकीट दाखवणे अनिवार्य केल्याचे म्हटले. निर्णय का : श्वेतांसाठी ट्रम्पना वाढवायच्या संधी ट्रम्प डीईआय संपवून गुणवत्तेवर आधारित नोकरी व शैक्षणिक आरक्षण देऊ असे म्हणताहेत. अमेरिकेच्या ३५ कोटी लोकसंख्येपैकी २० कोटी लोक श्वेत आहेत. ती ट्रम्प यांची कोअर व्होट बँक आहे. तेे डीईआयविरोधी आहेत. १२ कोटी श्वेत सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करतात. ट्रम्प डीईआय संपवून त्यांच्यासाठी नोकरीच्या जास्त संधी निर्माण करत आहेत. मस्क यांच्या नेतृत्वाखाली डोजी (सरकारी कार्यक्षमतेचा विभाग) स्थापनेचे खरे उद्दिष्टच बिगरश्वेतांना नोकऱ्यांतून बाहेर काढणे आहे. काय डीईआय… याद्वारे समाजातील सर्व घटकांना कामाची समान संधी रोजगार, शिक्षण आणि इतर क्षेत्रांत सर्व वर्गांना समान संधी देण्यासाठी १९६० पासून अमेरिकेत डीईआय कार्यक्रम सुरू आहे. तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ. केनेडी आणि मार्टिन ल्यूथर किंग यांच्या आदर्शांनी प्रेरित आहे. ते कसे कार्य करते: फेडरल आणि राज्य सरकारे धार्मिक आणि वांशिक अल्पसंख्याकांना रोजगार देतात. महिला, दिव्यांग आणि तृतीयपंथीयांनाही याद्वारे नोकऱ्या मिळतात. सर्व सरकारी विभागांमध्ये निश्चित कोटा आहे. अमेरिकेचा डीईआय कार्यक्रम भारतातील विविध वर्गांसाठी लागू आरक्षण प्रणालीशी समतुल्य म्हणता येईल. खासगी क्षेत्रात अनिवार्य अमेरिकेत खासगी क्षेत्रासाठी डीईआय प्रोग्राममध्ये नोकऱ्या प्रदान करणे अनिवार्य आहे. मेटा-ॲमेझॉनची घोषणा मेटा, बोइंग, ॲमेझॉन, वॉलमार्ट, टार्गेट, फोर्ड, मोलसन, हार्ले डेव्हिडसन व मॅकडोनाल्डने डीईआई बंदची घोषणा केली. टिम कुकचे ॲपल आणि रिटेल स्टोअर कॉस्टकोसारख्या दोन मोठ्या कंपन्यांनी डीईआय सुरू ठेवण्याबद्दल घाेषणा केली.