सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावामध्ये बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया:आमच्या गावातून कमी मते कशी? प्रशासनाचा मात्र विरोध
सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावामध्ये बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. या मतदारसंघातील आमदार उत्तम जानकर यांना या गावातून कमी मतदान मिळाले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे बॅलेट पेपर वर मतदान घेऊन वास्तव समोर आणण्याचा गावातील एका गटाचा हा प्रयत्न आहे. मात्र प्रशासनाने या प्रक्रियेला विरोध केला असून गावामध्ये जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. मारकडवाडी गावाच्या ग्रामस्थांच्या वतीने मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. गावामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यभरातून विरोधी पक्षाचे पदाधिकारी ईव्हीएम वर शंका व्यक्त करत आहेत. तर सत्ताधारी पक्ष त्यांना प्रत्युत्तर देखील देत आहेत. त्यातच सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी या गावातील ग्रामस्थांनी थेट बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला. आमच्या गावातून उत्तम जानकर यांना अधिक मते मिळायला हवी होती. ती कमी कशी झाली? असा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित करत ही प्रक्रिया राबवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता या प्रक्रियेकडे राज्याचे लक्ष लागला आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… बजरंग सोनवणे यांची जीभ घसरली:पत्रकारावर टीका करताना बायकोचा -मुलाचा उल्लेख; पत्रकारितेला लोकसभेचा चौथा स्तंभ ठरवले बीड लोकसभा मतदारसंघातील खासदार बजरंग सोनवणे यांची विधानसभा निवडणुकीनंतर बोलतात जीभ घसरली आहे. एका पत्रकाराने लावलेल्या बातमीचा उल्लेख करत बजरंग सोनवणे यांनी थेट पत्रकाराच्या बायकोचा आणि मुलाचा उल्लेख केला. माझ्यावर तुझ्या बायकोला किंवा पोराला संशय आला का? असे म्हणत सोनवणे यांनी पत्रकारितेला लोकसभेचा चौथा स्तंभ ठरवले आहे. त्यांनी लावलेल्या या जावई शोधावर देखील आता मतदारसंघातून टीका होत आहे. पूर्ण बातमी वाचा….