बांगलादेश कट्टरपंथी इस्कॉन बंदीसाठी रस्त्यावर, सरकारला दिला अल्टिमेटम:हायकोर्टाचा बंदीला नकार, जुम्म्याच्या नमाजानंतर माेठे आंदोलन
बांगलादेश हायकोर्टाद्वारे इस्कॉनवर बंदी घालण्यास नकार दिल्या प्रकरणात कट्टरपंथी गटांनी शुक्रवारी मोठा गदारोळ केला. शुक्रवारी जुम्म्याची नमाज अदा केल्यानंतर देशभरातील मशिदींत लखो मुस्लिमांनी निदर्शने केली. सर्वात मोठे आंदोलन राजधानी ढाका आणि चटगावमध्ये झाले. आंदोलकांनी इस्कॉनला ‘हिंदू कट्टरपंथी संघटन’ व राष्ट्रविरोधी गट ठरवत त्यावर तत्काळ बंदी घालण्याची मागणी केली आणि बांगलादेशातील युनूस सरकारला अल्टीमेटम दिला आहे. २६ नोव्हेंबरपासून वाद सुरू झाला. तेव्हा सनातनी जागरण जाेतचे प्रवक्ते चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना कोर्टात हजर करताना उसळलेल्या हिंसाचारात चटगावचे वकील सैफुल इस्लाम अलिफ यांचा मृत्यू झाला होता. काळजीवाहू सरकारच्या धार्मिक प्रकरणांचे मंत्री खालिद हुसेन म्हणाले, वकिलाच्या हत्येत सहभागी कुणालाही सोडणार नाही. इकडे… काेलकात्यात इस्कॉनची निदर्शने, विहिंपने केली २ दिवस भारत बंदची घोषणा कोलकाता/नवी दिल्ली| बांगलादेश तुरुंगात कैद हिंदू आध्यात्मिक नेते चिन्मय कृष्ण दास यांच्या सुटकेसाठी इस्कॉनने दुसऱ्या दिवशीही कोलकात्यात निदर्शने केली. यादरम्यान बांगलादेशात धार्मिक अल्पसंख्याकांच्या दुर्दशेबाबत चिंता व्यक्त केली. विश्व हिंदू परिषदेने बांगलादेशात धार्मिक अल्पसंख्यकांवर होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध शुक्रवारी दोन दिवसीय राष्ट्रव्यापी निदर्शनाची घोषणा केली. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी सांगितले की, विहिंप व बजरंग दल, हिंदू समाजातील सर्व जातींना मिळून अल्पसंख्याक व त्यांच्या मानवी हक्काच्या संरक्षणासाठी अांदोलनात भाग घेऊ. हिंदूंचा वापर करून अराजकता पसरवण्याचा कट : आंदोलक शुक्रवारच्या नमाजानंतर ढाका आणि चितगावमधील सर्वात मोठ्या रॅलींमध्ये खलिदा झिया यांच्या बीएनपीची विद्यार्थी शाखा (छात्र दल), हिफाजत-ए-इस्लाम, खिलाफत मजलिस आणि इस्लामिक चळवळी या कट्टरवादी संघटनांसह अनेक धार्मिक-आधारित संघटना आणि राजकीय पक्ष सहभागी झाले. देशभरात ही निदर्शने झाली. देशातील पराभूत शक्ती अराजकता पसरवण्यासाठी हिंदूंचा वापर करत असल्याचे हिफाजतने म्हटले आहे. गेल्या मंगळवारी वकील सैफुल इस्लाम अलिफ यांची ज्या पद्धतीने हत्या झाली, त्याला गृहयुद्ध भडकवण्याखेरीज दुसरे काय म्हणावे? अल्पसंख्याकांची सुरक्षा करावी : भारत बांगलादेशमध्ये काळजीवाहू सरकारला सर्व अल्पसंख्याकाच्या सुरक्षेची जबाबदारी बजावली पाहिजे,असे भारताने शुक्रवारी सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल म्हणाले, भारताने बांगलादेश सरकारसमोर हिंदू आणि अन्य अल्पसंख्याकावर धोके आणि ‘लक्ष्यित हल्ल्याबाबत’ सतत दृढतापूर्वक चर्चा केली आहे. ते म्हणाले, या प्रकरणी आमची स्थिती स्पष्ट आहे. बांगलादेशने अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची जबाबदारी बजावली पाहिजे.