कंगना रणौतच्या एमर्जन्सीला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी:लवकरच तारीख जाहीर होऊ शकते, वादात अडकला होता चित्रपट
कंगना रणौतच्या ‘एमर्जन्सी’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. लवकरच कंगना रणौत रिलीज डेट अधिकृत करेल. या चित्रपटाबाबत शीख संघटनांनी आक्षेप घेतला होता, त्यामुळे सीबीएफसीने प्रमाणपत्र रोखून धरले होते. या प्रकरणावर कंगनाने संतापही व्यक्त केला होता. या चित्रपटातील अनेक दृश्यांवर सीबीएफसीने आक्षेप घेतला होता. सीबीएफसीने या चित्रपटातील 3 दृश्ये हटवण्याच्या सूचना...