युक्रेनच्या पॉवरग्रीडवर रशियाचा सर्वात मोठा हल्ला…:30 लाख लोक अंधारात, रशियाचा 120 क्षेपणास्त्रे, 90 ड्रोनचा हल्ला
रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याला मंगळवारी १००० दिवस पूर्ण होतील. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियन लष्कराचे रणगाडे युक्रेनच्या सीमेत घुसले तेव्हा युक्रेन लवकच पराभव मान्य करेल,असे वाटत होते. मात्र, जवळपास पावणे तीन वर्षांपासून युक्रेनी लष्कराने ना केवळ रशियन लष्कराला थोपवले आहे, तर त्याने हल्ला करून रशियाच्या कुर्स्क क्षेत्रावरही कब्जा केला आहे. युक्रेनी लष्कराने सिद्ध केले की, ते रशियान लष्कराची आगेकूच मंदावू शकते....