सूरजसिंह ठाकूर आणि चंद्रेश दुबे यांना काँग्रेसची नोटीस:नसीम खान यांच्याविरोधात काम केल्याचा आरोप, पक्षाकडून कोणतीही नोटीस नाही- ठाकूर

मुंबईच्या चांदिवली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आणि कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या पराभवानंतर एनएसयूआयचे माजी अध्यक्ष सूरज सिंह ठाकूर आणि युवक काँग्रेसचे नेते चंद्रेश दुबे यांना त्यांच्या तक्रारीवरून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत नसीम खान यांच्या विरोधात काम केल्याबद्दल काँग्रेसच्या काही नेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे पत्रात लिहिले आहे. चांदिवली विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळवलेले आरिफ नसीम खान यांच्या विरोधात काम केल्याबद्दल महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या आदेशावरून तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यावर सूरज सिंह ठाकूर यांनी देखील 4 पानी पत्रातून प्रत्युत्तर दिले आहे. सदर पत्र हे 24 ऑक्टोबर 2024 रोजी पाठवण्यात आले आहे. मात्र नसीम खान यांनी 28 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरला होता. तसेच असे कोणते पत्र मला पाठवले आहे याची माहिती मला माध्यमांमधून मिळाली. अधिकृतरीत्या मला पक्षाकडून कोणतीही नोटीस आली नसल्याचे सूरज सिंह ठाकूर म्हणाले आहेत. पुढे सूरज सिंह ठाकूर म्हणाले, नसीम खान यांनी पूर्वीपासूनच हे सुनियोजित कट माझ्याविरोधात रचला असल्याचे दिसते. त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही. मी देखील चांदिवली मतदारसंघातून तिकीट मागितले होते. त्याच ईर्ष्यापोटी माझ्याविरोधात खोटा कट रचण्यात आला असल्याचा आरोप सूरज सिंह ठाकूर यांनी केला आहे. सूरज सिंह ठाकूर पुढे म्हणाले, मी नसीम खान प्रायव्हेट लिमिटेडचा कार्यकर्ता नसून काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांचा कार्यकर्ता आहे. त्याचबरोबर नसीम खान यांनी 20 वर्षे (1999-2019) आमदार असताना काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आणला नाही, असा आरोप सूरज सिंह ठाकूर यांनी केला.

Share

-