दिव्य मराठी अपडेट्स:आळंदीत इंद्रायणीकाठी सुमारे 3 लाख भाविकांचा मेळा; उद्या श्री ज्ञानोबा माउलींचा संजीवन समाधी सोहळा

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स इंद्रायणीकाठी 3 लाख भक्त; उद्या संजीवन समाधी सोहळा पुणे – उत्पत्ती एकादशीनिमित्त मंगळवारी आळंदीत इंद्रायणीकाठी सुमारे 3 लाख भाविकांचा मेळा जमला होता. गुरुवारी आळंदीत संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबा माउलींचा संजीवन समाधी सोहळा होणार आहे. त्यानिमित्त माउली मंदिर, इंद्रायणी नदी घाट येथे विद्युत रोषणाई आणि मंदिरात विविध फुलांची सजावट करण्यात आली होती. महाद्वारात पुष्प सजावटीतून साकारलेली श्री विठ्ठल रुक्मिणीची वैभवी मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. पहाटे घंटानाद झाला. मंगलमय सनई चौघड्याच्या वाद्यवादनात मंदिरात पहाट पूजेअंतर्गत 11 ब्रह्मवृंदाच्या वेदमंत्रोच्चारात पवमान अभिषेक झाला. माउलींच्या गाभाऱ्यात श्रींच्या संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पंचामृत अभिषेक पूजा झाली. यात दूध, दही, तूप, मध, साखर, आम्रखंड, सुगंधी तेल, उटणे, अत्तर लावत पोशाखात केशरी मेखला, शाल, सोनेरी मुकुट ठेवताच श्रींचे आकर्षक रूप सजले. आरती होताच मानकरी आणि पदाधिकाऱ्यांना देवस्थानतर्फे नारळ प्रसाद वाटप झाले. मेहकर दंगल : 20 आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी बुलडाणा – दोन आंतरधर्मीय लोकांमध्ये झालेल्या दगडफेक, वाहन जाळपोळ प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या 20 आरोपींना मेहकर येथील न्यायालयाने 7 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान मेहकर शहरातील जनजीवन आता पूर्वपदावर आले आहे. तरीही शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मेहकर येथील जानेफळ रोडवरील एका हॉटेलात जेवण केल्यानंतर दोघांमध्ये झालेल्या वादाचे रुपांतर दंगलीत होऊन दोन्ही बाजूच्या समाजकटकांनी एकमेकांवर दगडफेक केली. या दंगलीत चारचाकी व दोन मोटरसायकल, ऑटोरिक्षा पेटवले होते. या प्रकरणी तुषार साळवे (40 रा. माळी पेठ ) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शेख साजिद शेख करामत, शेख करामत शेख सत्तार, शेख अमीर शेख अब्दुल हमीद , शेख अर्मान शेख मन्सूर, शेख यामीन शेख अब्दुल हमीद, साहिल शाह अनिशा व इतर 30 ते 40जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर शेख साजिद शेख करामत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ,गणेश राऊत , ओम सौभागे, सुनील तिघाडे व इतर बारा जणांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी 20 आरोपींना अटक केली होती. या आरोपींना मेहकर न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. कामे उरकून आंतरवालीत या – जरांगे‎ बीड‎ – आता विधानसभा निवडणूक झाली. ‎‎संपला डोक्यातून निवडणूक काढून ‎‎टाका. आता लेकरांच्या भविष्यासाठी ‎‎आरक्षणाचा विचार करा. तुमच्या ‎‎लेकरांच्या भविष्यासाठी आरक्षण‎हवे आहे. त्यामुळे एकजुटीने तुटून‎पडा, असे आवाहन जरांगे पाटील‎यांनी केले. मंगळवारी बीडमध्ये‎आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.‎मराठा समाजाच्या निम्मे लोकांनी‎‎शेतात काम‎‎करावे. निम्मे‎‎लोकांनी‎‎अांतरवलीत यावे.‎‎कामे उरूकन घ्या‎‎सरकार स्थापन‎झाले की मी सराटी अंतरवाली येथे‎सामूहिक अामरण उपोषण सुरू‎करणार आहे.‎
मराठा समाजाने आता निवडणूक‎डोक्यातून काढून टाकावी. आता‎लढाई लेकरांच्या भविष्यासाठी आहे.‎कारण लेकाराला उद्या ॲडमीशन‎घ्यायचे आहे. त्याला इंजिनियर,‎डॉक्टर, तहसीलदार, पोलिस‎करायचे आहे. त्याला आरक्षणाची‎गरज आहे. ज्याला तुम्ही मतदान‎केले आहे, त्या पक्षातील नेत्यांना‎सांगा. तो कोणत्याही पक्षाचा असेल‎तरी मराठा आरक्षणासाठी भांडायला‎लावा, असे आवाहन त्यांनी केले.‎ सराफा व्यापाऱ्यावर चाकू हल्ला, साडेपाच लाखांचे दागिने पळवले नांदेड – जिल्ह्यातील अर्धापूर शहरातील दुकान बंद करून दुचाकीने घरी निघालेल्या सराफा व्यापाऱ्यास, दोघांनी चाकूहल्ला करुन लुटले. व्यापाऱ्याची सोने व रोकड असा 5 लाख 53 हजारांचा मुद्देमाल असलेली बॅग घेऊन चोरटे पसार झाले. अर्धापूर शहरातील कोर्टाच्या डाव्या बाजूच्या रस्त्यावर सोमवारी रात्री ही घटना घडली. सराफा व्यापारी बालाजी प्रभाकर मैड यांचे नगरपंचायतीसमोर सराफा दुकान आहे. ते नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी सहा वाजता दुकान बंद करून, पुतण्या साईनाथ मैडसोबत अर्धापूर येथील घराकडे दुचाकीने निघाले होते. यावेळी त्यांनी दुकानातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा 5 लाख व 53 हजार रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग सोबत घेतली होती. घराकडे जात असताना न्यायालयाच्या बाजूला असलेल्या रोडवर पाठीमागून आलेल्या दोन संशयितांच्या दुचाकीने त्यांना धडक दिली. यावेळी अनोळखी दोघा चोरट्यांनी लाथा बुक्यांनी मारहाण करत, चाकून त्यांच्या डोक्यात, हातावर, पायावर वार करून जखमी केले. तसेच गोळीबारासारखा आवाज करुन पैसे व दागिन्यांची बॅग हिसकावून पळ काढला. याप्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. परभणीतील 33 वर्षीय ‎तरुणाने घेतला गळफास‎ परभणी‎ – सेलू शहरातील फुलेनगरात 33 वर्षीय‎तरुणाने राहत्या घरी अँगलला‎मफलरच्या साह्याने गळफास घेऊन‎आत्महत्या केली. ही घटना सोमवारी‎25 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास‎उघडकीस आली.‎
सचिन मुकने असे मृताचे नाव‎आहे. त्याच्यावर एका‎आजारासंदर्भात उपचार सुरू होते.‎यामुळे नेहमीच तो घरी एकटा‎असायचा. सोमवारी दुपारी त्याने‎गळफास घेऊन आत्महत्या केली.‎ या घटनेची माहिती मि‌ळताच‎पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.‎तसेच शवविच्छेदनासाठी मृतदेह‎सेलू उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.‎डॉ. गजानन कोंडावार यांनी‎शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह‎नातेवाइकांच्या स्वाधीन केला.‎ 15 हजारांची लाच घेताना‎अभियंता, तंत्रज्ञ अटकेत‎ परभणी‎ – पावसाळ्यापासून बंद असलेल्या‎रोहित्राचा अहवाल घेण्यासाठी 15‎हजारांची लाच घेताना, कनिष्ठ‎अभियंता आणि कंत्राटी तंत्रज्ञानाला‎लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या‎पथकाने रांगेहाथ पकडले. मंगळवारी‎मानवत येथील महावितरण ग्रामीण‎विभागाच्या कार्यालयात ही कारवाई‎झाली. कनिष्ठ अभियंत्याला 70‎हजार रुपये, तर तंत्रज्ञानाला 20‎हजार रुपये पगार आहे.‎तक्रारदाराच्या शेतातील‎बोरवेलला विजपुरवठा करणारे‎रोहित्र पावसाळ्यापासून बंद होते. ते‎सुरु करण्यासाठी महावितरण‎कार्यालयातील कनिष्ठ अभियंता‎मोहम्मद तलहा मोहम्मद हिमायत‎(24), तसेच कंत्राटी तंत्रज्ञ महेश‎कोल्हेकर (26) यांनी, डीपी बंदचा‎अहवाल देण्यासाठी लाच घेतली.‎ राज्यसभेच्या 6 जागांसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 6 रिक्त जागांवर निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली आहे. 20 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी निकालही जाहीर होतील. आंध्र प्रदेशातील 3 जागांसह ओडिशा, हरियाणा आणि प. बंगालमधील प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होईल. 29 तारखेला चॅम्पियन्स ट्रॉफीचे ठरेल भवितव्य दुबई – चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संदर्भात सुरू असलेले वाद सोडवण्यासाठी आयसीसी 29 नोव्हेंबरला बैठक घेणार आहे. बीसीसीआय व पीसीबीसह सर्व मंडळांचे सदस्य या बैठकीत ऑनलाइन सहभागी होतील. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीला 100 दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. मात्र भारताने पाकिस्तानला न जाण्याच्या निर्णयामुळे स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप ठरले नाही. यामुळेच आयसीसीला बैठक आयोजित करून स्पर्धेशी संबंधित गोष्टींना अंतिम स्वरूप द्यायचे आहे. बैठकीत हायब्रिड मॉडेलवर चर्चा होऊ शकते.

Share

-